नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक पक्षांच्या सभांना सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यांसाठी  काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे.  ज्यांचे पुत्र भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचाही स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण या दोघांचाही यादीत समावेश आहे. या यादीत अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, डॉ. मनमोहन सिंह, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. तसंच कुमार केतकर, मोहम्मद अझरुद्दीन, नगमा मोराजी हे देखील महाराष्ट्रात पक्षाचा प्रचार करतील. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन युथ काँग्रेसला सतत कार्यमग्न ठेवणारे सत्यजित तांबे यांचं नाव यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. VIDEO | लोकसभेच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसची वाताहत | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी सोनिया गांधी राहुल गांधी डॉ. मनमोहन सिंह प्रियांका गांधी वाड्रा मल्लिकार्जुन खर्गे गुलाम नबी आझाद ज्योतिरादित्य शिंदे अशोक चव्हाण राधकृष्ण विखे पाटील सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात मुकुल वासनिक केसी वेणुगोपाल विजय वडेट्टीवार भाई जगताप विलास मुत्तेमवार राजीव सातव मिलिंद देवरा संजय निरुपम www.abpmajha.in नगमा मोराजी हर्षवर्धन पाटील कुमार केतकर शिवराज पाटील कृपाशंकर सिंह नितीन राऊत वसंत पुरके चंद्रकांत हांडोरे भालचंद्र मुणगेकर हुसेन दलवाई नसिम खान मोहम्मद अझरुद्दीन मुजफ्फर हुसेन इम्रान प्रताप गडी विश्वजीत कदम सचिन सावंत अमर राजूरकर हरिभाऊ राठोड रामारी रुपनवार अमिता चव्हाण