Mumbadevi Vidhan Sabha Constituency 2024: राज्यात विधानसभेची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) चुरस रंगली आहे. राज्यातील अभूतपूर्व सत्तासंघर्षामुळे यंदाची निवडणूक वेगळी असणार आहे. अशातच मुंबईकडे (Mumbai Vidhan Sabha Election) सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्यामुळे विधानसभेत मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकण्याकडे सर्वच राजकीय पक्षांचा कल आहे. मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवीचं मंदिर (Mumbadevi Temple) असलेला मतदारसंघ म्हणजेच, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबादेवी मतदारसंघाचे नाव हे येथे असलेल्या मुंबा देवी मंदिराच्या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. सध्या येथे काँग्रेसचे अमीन पटेल हे विद्यमान आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी तब्बल तिनदा निवडणूक जिंकली आहे. तसेच, चौथ्यांचा आपला विजय नोंदवण्यासाठी अमीन पटेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण, यंदाची निवडणूक अमीन पटेल यांच्यासाठी सोपी नसणार आहे. काँग्रेसच्या अमीन पटेल (Amin Patel) यांच्यासमोर यंदा शिवसेना शिंदे गटाच्या शायना एनसी (Shaina NC) यांचं आव्हान असणार आहे. त्यामुळे गेल्या सहा निवडणुकांपासून काबीज केलेली जागा आपल्याकडे राखण्यात काँग्रेसला यश येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

2024 च्या विधानसभेच्या रिंगणात कोण आमने-सामने? 

उमेदवाराचं नाव पक्ष
अमीन पटेल (Amin Patel) काँग्रेस (महाविकास आघाडी)
शायना एनसी (Shaina NC) शिवसेना (महायुती)

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 

काँग्रेसचे अमीन पटेल यांनी 58 हजार 952 मतं मिळवून निवडणूक जिंकली. 
शिवसेनेचे पांडुरंग गणपत सकपाळ 35297 मतं मिळवून दुसऱ्या स्थानी होते. 
एमआयएमच्या बशीर मूसा पटेल 6373 मतं मिळवून तिसऱ्या स्थानी होते
मनसेचे केशव रमेश मुळे 3185 मतांसह चौथ्या स्थानी होते. 

2014 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 

अमीन पटेल यांना 39 हजार 188 मतं मिळवून विजय मिळवला.
दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाचे अतुल शहा होते त्यांना 30 हजार 675 मतं मिळाली. 

मतदारसंघाबाबत थोडसं... 

2008 मध्ये लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली. तेव्हापासून या मतदारसंघावर काँग्रेसनं ताबा मिळवला. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या मतदारसंघात दोन टोकाच्या संस्कृती एकत्र नांदतात. अतिश्रीमंत, उच्चभ्रू लोकवस्ती असलेला दक्षिण मुंबईचा कॉस्मोपॉलिटन भाग एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कामाठीपुरा, कुंभारवाडा, उमरखाडी अशा वस्त्या आणि झोपडपट्ट्या आणि चाळींचा भाग अशी रचना मुंबादेवीची आहे. डोंगरीसारखा मुस्लीमबहुल एरियाही या मतदारसंघात येतो. ही जागा गेल्या तीन निवडणुकांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. 2008 पूर्वी पुनर्रचना होण्यापूर्वी राज पुरोहित हे भाजपचे नेते या भागातील आमदार होते. त्यांनी 1990 पासून 2004 पर्यंत राज पुरोहित निवडून येत होते. दक्षिण मुंबईतील हा भाजपचा गड त्यांनीच निर्माण केला होता. पण नव्या रचनेत दलित, मुस्लीम मतदारांचा टक्का वाढला आणि काँग्रेसचे अमीन पटेल मुंबादेवीतून निवडून येऊ लागले. त्यामुळे यंदाही अमीन पटेल चौथ्यांदा विजयी होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटली जाणारी ही जागा गेल्या सहा निवडणुकांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनेच मुंबादेवीची जागा जिंकली होती. आता मुस्लिमांची एकगठ्ठा मतं पुन्हा एकदा काँग्रेसलामिळणार का? की शायना एनसी यांना मुंबादेवी पावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.