जयपूर : यावेळची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) चांगलीच चुरशीची ठरली. आम्ही एनडीएतील (NDA) सर्व पक्ष कोणत्याही परिस्थितीत यावेळी 400 पेक्षा अधिक जागा जिंकू असा दावा भाजपकडून (BJP) केला जात होता. प्रत्यक्ष मात्र भाजपची निराशा झाली. या निवडणुकीत संपूर्ण एनडीएला 300 चा आकडा पार करता आला नाही. विशेष म्हणजे काँग्रेसच्या जागा लक्षणीय वाढल्या. भाजपला उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र यासारख्या राज्यांत चांगला फटका बसला. दरम्यान राजस्थानमध्येही भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. येथे काँग्रेसने संजना जाटव (Sanjana Jatav) यांच्या रुपात थेट मुख्यमंत्र्यांचा गड भेदला आहे. त्या अवघ्या 25 व्या वर्षी खासदार झाल्या आहेत.
अवघ्या 25 व्या वर्षी झाल्या खासदार
संजना जाटव या अवघ्या 25 वर्षांच्या आहेत. भरतपूर या जागेवर जिंकून त्या यावेळी सर्वांत कमी वयात खासदार होणाऱ्या खासदारांच्या पंक्तीत जाऊन बसल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या जिल्ह्यातूनच थेट 51 हजार 983 मतांच्या फरकाने हा विजय मिळवला आहे. भाजपने या जागेवर रामस्वरुप कोली यांना तिकीट दिले होते. 2019 साली भाजपचे रंजिता कोली यांनी काँग्रेसचे अभिजित कुमार जाटव यांचा 3 लाख 18 हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी मात्र चित्र बदलले आहे संजना जाटव यांनी या जागेवर विजयी पताका फटकवली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात संजना जाटव यांचा विजय
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे मुळचे भरतपूर जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे या जेगवरून कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. भरतपूरची निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. कोणत्याही परिस्थितीत भरतपूरच्या रुपात भाजपला धक्का द्यायचा, निश्चय काँग्रेसने केला होता प्रत्यक्ष झालेही तसेच. संजना जाटव यांनी भरतपूर येथून मोठ्या मताधिक्याने भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले.
संजना जाटव सर्वाधिक कमी वायाच्या खासदारांच्या पंक्तीत
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांनी अनेक तरुण नेत्यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. यामध्ये संजना जाटव यांचादेखील समावेश होता. संजना जाटव या अवघ्या 25 वर्षांच्या आहेत. समस्तीपूर येथून निवडून आलेल्या शांभवी चौधरी यादेखील अवघ्या 25 वर्षांच्या आहेत. त्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल अशोक चौधरी यांच्या कन्या आहेत. त्या एनडीएतील सर्वाधिक कमी वयाच्या खासदार आहेत.
संजना जाटव यांना एकूण 5 लाख 79 हजार 890 मते पडली आहेत. तर भाजपचे उमेदवार रामस्वरुप कोली यांना 5 लाख 27 हजार 907 मते मिळाली आहेत. जाटव यांनी 51 हजार 983 मतांनी कोली यांच्यावर मात केली आहे.
पुष्पेंद्र आणि प्रिया सरोज
पुष्पेंद्र सरोज यांनी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर कुशांबी या जागेवरून विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवाराला 1 लाख 39944 मतांच्या फरकाने पराभूत केले आहे. तेही अवघ्या 25 वर्षांचे आहेत. प्रिया सरोज यांनीदेखील भाजपचे उमेदवार भोलानाथ यांना तब्बल 35,850 मतांनी पराभूत केले आहे. त्यादेखील 25 वर्षांच्या आहेत. त्यांनी मछलीशहर या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
हेही वाचा :