Manoj Jarange Patil, जालना : जालन्यातील अंतरवाली सराटीत दलित, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची बैठक पार पडली. या बैठकीला राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्या सह वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या वतीने माजेद शेख हे उपस्थित होते. मराठा, मुस्लिम आणि दलीत हे समीकरण जुळल्यानंतर आज (दि.2) अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आलीय. या बैठकीत जागेच्या बाबत चर्चा झाली, उद्या पुन्हा चर्चा होईल अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय.
सकाळी 7 वाजता राज्यातील सर्व उमेदवारांनी अंतरवाली सराटीत चर्चेला यावे
दरम्यान, रविवारी (दि.3) सकाळी 7 वाजता राज्यातील सर्व उमेदवारांनी अंतरवाली सराटीत चर्चेला यावे, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मतदार संघ आणि उमेदवारांच्या नावाची मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या संध्याकाळी 5 किंवा रात्री 8/10 वाजे पर्यंत चांगला निर्णय होईल, असं जरांगे यांनी म्हटलंय. या देशात रेशीमबागेला अंतरवाली चॅलेंज ठरेल, असं वक्तव्य राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी बोलतांना केलंय. या महाराष्ट्रात जरांगेंच्या हाती सत्ता यावी ही सर्वांचीच अपेक्षा असल्याचं मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केलय.
परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना ताकत द्यावी - राजू शेट्टी
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज (दि.2) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी अंतरवालीमध्ये दाखल झाले होते. या दोघांमध्ये एक तासभर चर्चा झाली, यावेळी शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना मनोज जरांगे यांनी मदत करावी. तसेच परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना त्यांनी ताकत द्यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे यांना केली.
राजू शेट्टी यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट , अंतरवाली सराटी दोघांमध्ये चर्चा.....
जवळपास एक तास अंतरवाली सराटीत राजू शेट्टी आणि मनोज जरांगे यांची चर्चा झालीय...
शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांना मदत करण्याची भूमिका जरांगे पाटलांनी घ्यावी भेटीनंतर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया....
परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतोय या उमेदवारांना जरांगे पाटलांनी ताकद द्यावी अशी विनंती केल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली...
इतर महत्त्वाच्या बातम्या