Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारख्या जाहीर केल्या. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे.  


अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीची तयारी सुरू केली आहेत. सर्व राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात पाऊल टाकले असून ग्रामीण भाग पिंजून काढायला सुरुवात केली आहे. तसेच चित्र मलकापूर विधानसभा मतदारसंघात पाहिला मिळत आहे. जेथे भाजपा व काँग्रेस मध्येच सामना रंगणार असला तरी महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपल्या पक्षाच्या दावेदारीसाठी जागा तयार करत आहे.


मलकापूर मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि मलकापूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. मलकापूर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो. 2019 मध्ये भाजपचा बालेकिल्ला असलेली मलकापूर विधानसभा जागा काँग्रेसने जिंकल्यानंतर ती परत घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. ही जागा रावल लोकसभा मतदारसंघात येते जिथे भाजपच्या रक्षा खडसे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. अशा स्थितीत येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार असून, मलकापूर विधानसभेचा निकाल कोणत्या पक्षाच्या बाजूने लागणार हे जनतेने ठरवायचे आहे.  


मलकापूर विधानसभा मतदारसंघात मलकापूरशिवाय चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर आणि मुक्ताईनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.


मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा जुना इतिहास 


मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास खूप जुना आहे. ही जागा 1952 पासून अस्तित्वात आहे. या जागेला भाजपचा बालेकिल्लाही म्हटले जाते. कारण 1999 पासून सातत्याने येथे भाजपची सत्ता आहे. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजेश एकाडे यांनी भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. 


गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राजेश एकाडे यांनी भाजपच्या चैनसुख मदनलाल संचेती यांचा पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश एकाडे यांना 86 हजार 276 मतं मिळाली होती. तर भाजपच्या चैनसुख संचेती यांना 71 हजार 892 मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या नितीन नंदुरकर यांना 12 हजार 549 मते मिळाली होती.


यंदा पण काँग्रेस व भाजपातच रंगणार चुरस


महाराष्ट्रातील जागावाट झाले आहे काँग्रेस व भाजपा यांच्यात चुरशीची लढत होणार असे चित्र दिसत आहे. काँग्रेसकडून आमदार राजेश एकडे यांना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे भाजपाकडून चैनसुख संचेती यांना उमेदवारी दिली आहे.