Mahayuti Seat Sharing : महायुतीमध्ये मुंबईतील (Mumbai) काही जागांचा तिढा सुटला आहे. अंधेरी पूर्व विधानसभेतून (Maharashtra Vidhansabha Election) लढण्यासाठी भाजप नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून अंधेरी पूर्व विधानसभेतून तिकीट देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे भाजपच्या वाट्याला कलिना हा विधानसभा मतदारसंघ येणार आहे. 


मुंबईतील काही जागांचा तिढा सुटला


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली. दरम्यान, मुंबईतील काही जागांचा पेच अद्यापही कायम असला तरी काही जागांवर मार्ग काढण्यात यश आलं आहे. 


दिल्लीतील आजच्या बैठकीत मुंबईच्या जागांसंदर्भात जे ठरलं, त्यासंदर्भात चर्चा पार पडली. मुंबईत बोरिवली, वर्सोवा, घाटकोपर पूर्व, शिवडी, चेंबूर, विक्रोळी, भांडूपच्या जागेवरुन पेच कायम असल्याची माहिती आहे. तर भाजपच्या ताब्यातील बोरिवली, वर्सोवा व घाटकोपर पूर्व जागांवर उमेदवार बदलण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. शिवसेनेकडे उमेदवार नसलेल्या शिवडी, चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपच्या जागांवर चर्चा भाजपच्या बैठकीत चर्चा झाली. भाजपकडून शिवसेनेला उमेदवार देण्याबाबतची सागर निवासस्थानी खलबतं झाली आहेत. 


भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गवित यांची पुन्हा शिंदे गटात घरवापसी होण्याची शक्यता


शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या गावित यांची शिवसेना शिंदे गटात पुन्हा घरवापसी ? 


लोकसभेला तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या गावितांनी केला होता भाजपमध्ये प्रवेश. 


 गावित यांच्यासोबत पालघरचे माजी आमदार विलास तरे हे देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार ?


पालघर विधानसभेसाठी राजेंद्र गावित तर बोईसर विधानसभेसाठी (Maharashtra Vidhansabha Election) विलास तरे यांच्या नावाची चाचपणी ? 


पालघर विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे सध्याचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्यावर टांगती तलवार . पालघर मधील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गट आयात उमेदवारांना देणार ?


बंड करतेवेळी गुजरात कडे जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचं कारण पुढे करून आधार


इतर महत्त्वाच्या बातम्या


Shivadi Assembly constituency : ठाकरेंना भेटल्यानंतर लालबागमध्ये शिवसैनिकांना दंडवत, उमेदवारी नाकारली तरी पक्षाबरोबर कायम राहणार; सुधीर साळवींची मोठी घोषणा


Nana Patole : महाराष्ट्रातील जागावाटप, काँग्रेसची दुसरी अन् तिसरी यादी, राहुल गांधींच्या नाराजीच्या चर्चा, नाना पटोलेंनी सगळं सांगितलं