Mahavikas Aaghadi Seat Sharing :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा कायम होता. अखेर महाविकास आघाडीत मुंबईतील जागांवर तोडगा निघाला आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ असणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वात जास्त जागा लढणार आहे. तर त्यानंतर काँग्रेस पक्षाने देखील बऱ्याच जागा खेचून आणल्या आहेत.
महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील जागावाटप शेवटच्या दिवशी फायनल
महाविकास आघाडीतील मुंबईतील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय. 22-10-3-1 हा असणार महाविकास आघाडीचा मुंबईतील अंतिम फॉर्म्यला असणार आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष ठरणार आहे. मुंबईत 36 पैकी 22 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढणार आहे. काँग्रेसने दिलेल्या 18 जागांच्या प्रस्तावापैकी काँग्रेस फक्त 10 जागा मुंबईत लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष तीन जागा लढवणार आहे. मुंबईत समाजवादी पक्षासाठी शिवाजीनगर मानखुर्ची जागा महाविकास आघाडीत देण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष विदर्भात अधिक जागा लढवत असल्याने, मुंबई ताकद असलेले सर्वाधिक मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाने आपल्याकडे घेतले आहेत.
मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणत्या जागा लढणार?
1.मागाठाणे – उदेश पाटेकर2. विक्रोळी – सुनील राऊत3. भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर4. जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर5. दिंडोशी – सुनील प्रभू6. गोरेगांव – समीर देसाई7. अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके8.चेंबूर – प्रकाश फातर्पेकर9. कुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकर10. कलीना – संजय पोतनीस11. वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई12. माहिम – महेश सावंत13. वरळी – आदित्य ठाकरे14. वडाळा -श्रद्धा जाधव15. शिवडी- अजय चौधरी16. भायखळा- मनोज जामसुतकर17. वर्सोवा - हरुन खान18. घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव19. विलेपार्ले - संदिप नाईक20. दहिसर - विनोद घोसाळकर21. मलबार हिल -भैरूलाल चौधरी जैन 22. बोरिवली - संजय भोसले
मुंबईत काँग्रेस कोणत्या जागा लढणार?
23.कुलाबा - हिरा देवसी 24.अंधेरी पश्चिम -अशोक जाधव 25. सायन कोळीवाडा -गणेश यादव 26.चारकोप -यशवंत सिंग 27. कांदिवली पूर्व -कालू बढेलिया 28.मुंबादेवी - अमीन पटेल 29.धारावी -ज्योती गायकवाड30.चांदीवली -नसीम खान 31.मालाड पश्चिम - असलम शेख 32.वांद्रे पश्चिम - असिफ झकारीया
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत 3 जागा लढणार
33.घाटकोपर पूर्व - राखी जाधव34.अणुशक्ती नगर - फहाद अहमद 35. मुलुंड - संगीता वाझे
समाजवादी पक्ष
36. शिवाजीनगर मानखुर्द - अबू आझमी
इतर महत्त्वाच्या बातम्या
