मुंबई : राज्यात चुरशीने मतदान सुरू असून दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान झालं असून अनेक ठिकाणी मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याचं दिसून येतंय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वाधिक म्हणजे 62.99 टक्के मतदान झालं आहे. तर ठाण्यामध्ये सर्वात कमी म्हणजे 38.94 तर मुंबई शहरात 39.34 टक्के मतदान झालं. 


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झालं होतं. आता 3 वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान झालं आहे. मतदानासाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत वेळ असून अनेक मतदानकेंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्याचं चित्र आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. 


राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :



ही बातमी वाचा: