Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. आत्तापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीने जवळपास महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती पाहायला मिळणार आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय वळणं आली. त्यातून महाविकास आघाडीत 3 आणि महायुतीत 3 पक्षाचं अस्तित्व निर्माण झालं आहे. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे राज्यात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारी न मिळालेला मोठा वर्ग आहे. उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी बंडखोरीचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनेक मतदारसंघात राजकीय बंडखोरांनी तोंड वर काढल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा 1995 सारखी परिस्थिती येऊ शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करु लागले आहेत. कारण 1995 मध्ये राज्यात 45 आमदार हे अपक्ष निवडून आले होते. तत्कालीन काळात काँग्रेसमध्ये गटा तटाचं राजकारण वाढलं होतं. त्यामुळे तिकीट कापण्यात आलेल्या अनेक नेत्यांनी बंडखोरी करत निवडणुका लढवल्या होत्या. दरम्यान, 1995 नंतर निवडणुकीतनंतर अनेक अपक्ष आमदार निवडून आले होते. दरम्यान, त्यावेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अपक्षांची मोट बांधत त्यांना सोबत घेतलं होतं. त्यामुळे राज्यात सेना-भाजप युतीचं सरकार मजबूत होण्यासाठी मदत झाली होती. दरम्यान, 1995 नंतर अपक्षाचं महत्त्व देखील वाढलं होतं. अनेक अपक्ष आमदारांना राज्यमंत्रिपद देण्यात आली होती.
सध्याच्या घडीला राज्यात अपक्ष उमेदवारांचं 'मोहोळ'
गेल्या पाच वर्षांपासून तयारी करत असलेल्या ज्या नेत्यांना महाविकास आघाडी आणि महायुतीकडून तिकीट मिळाले नाही, त्यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचं ठरवलंय. यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीत या अपक्ष उमेदवारांचा फटका बसू नये यासाठी सर्वच पक्षांनी त्यांच्या पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. अनेकांना विधानपरिषद आणि महामंडळांची आश्वासने देण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, लोकसभेला पराभूत झालेल्या अनेकांनी देखील विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत किती अपक्ष आमदार निवडून येतात हे पाहाणे देखील महत्त्वाचे असणार आहे.
महाराष्ट्रात बंडखोरी झालेले मतदारसंघ
विदर्भ-बंडखोरी
-------------
अमरावती- बडनेरा मतदारसंघ- भाजपचे तुषार भारतीय अपक्ष अर्ज वि. रवी राणा - भाजपचा पाठिंबा
दर्यापूर - काँग्रेसचे गुणवंत देवपारे महाविकास आघाडी विरोधात आज बंडखोरी,भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले महायुती विरोधात बंडखोरी
यवतमाळ- उमरखेड मतदारसंघात महायुती बंडखोरी, भाजपचे माजी आमदार राजू नजरधने यवतमाळच्या उमरखेड मतदार संघातून मनसेकडून उमेदवारी
नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बंडखोरी-राजश्री जिचकार यांनी देखील काटोलमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला
उत्तर नागपूर मतदारसंघातून काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या विरोधात जेष्ठ नगरसेवक मनोज सांगोले यांनी बंडखोरी केली
पश्चिम नागपूर मधून विकास ठाकरे विरोधात काँग्रेसचे निलंबित नरेंद्र जिचकार यांनी उमेदवारी अर्ज भरला
बुलढाणा- सिंदखेड राजात महायुतीत बंडखोरी- भाजपा पदाधिकारी अंकुर देशपांडे यांनी दाखल केली अपक्ष उमेदवारी, सिंदखेड राजात डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश
भंडारा विधानसभा : भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते चेतक डोंगरे यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली
तुमसर विधानसभा- तुमसर विधानसभेत शरद पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे यांनी बंडखोरी करीत नामांकन दाखल केला. तुमसर विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ठाकाचंद मुंगूसमारे यांनी बंडाखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली.
साकोली विधानसभा भाजपकडून उमेदवारीसाठी दावेदारी करणारे संघाचे विदेश प्रचारक डॉ सोमदत्त करंजेकर यांनी बंडखोरी करीत त्यांचं नामांकन अर्ज दाखल केला आहे.
नंदुरबार- आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे लहान बंधू शरद गावित यांनी नवापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी
शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केले आहे
बुलढाणा मतदार संघात शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी बघायला मिळत आहे याठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या प्रेमलता सोनोने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
वाशिम विधानसभा मतदारसंघ- विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटात मदन उर्फ राजा भैया पवार यांनी शिवसेना उबाठा गटाकडून अधिकृत उमेदवार डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या विरोधात बंडखोरी केली..
वाशिम- रिसोड मतदारसंघात महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भावना गवळी यांच्या विरोधात बंड करत भाजपचे अनंतराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरलाय
वाशिम- कारंजा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार ज्ञायक पाटणी यांच्या विरोधात बंडखोरी करत काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरलाय
अकोला पश्चिम- राजेश मिश्रा, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख. मिश्रा यांनी बंडखोरी केली असून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय
------------------------------------------
पश्चिम महराष्ट्र- बंडखोरी
----------------
पुणे- वडगाव शेरीतून जगदिश मुळीक अपक्ष अर्ज- सुनील टिंगरेंना अजित पावारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी
सोलापूर दक्षिण विधानसभा - सुभाष देशमुख - भाजप उमेदवार वि. बंडखोर - सोमनाथ वैद्य (भाजपतून बंडखोरी करत अपक्ष लढणार)
सांगली विधानसभेत काँग्रेस मध्ये तर शिराळा आणि जत मध्ये भाजपात बंडखोरी..सांगली विधानसभा मध्ये काँग्रेस कडून पृथ्वीराज पाटील यांना तिकीट मिळाल्याने जयश्रीताई पाटील यांनी नाराज
जतमध्ये भाजपात बंडखोरी... भाजपचे नेते तमनगौडा रवीपाटील लढवणार अपक्ष निवडणूक लढवणार
-----------------------------------
उत्तर महाराष्ट्र- बंडखोरी
--------------------
नंदुरबार -अक्कलकुवा:-विधानसभा मतदार संघात भाजपचे माजी खासदार डॉ हिना गावित यानी बंडख़ोरी केली, ही जागा शिवसेनेला सुटली
नाशिक- चांदवड- भाजपचे डॉ.राहुल आहेर वि. केदा आहेर
धुळे- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाराज झालेल्या हिलाल माळी यांनी बंडखोरीकर आपल्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी केली आहे तर शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा दिल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या श्याम सनेर यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली
जळगाव- पारोळा एरंडोल मतदार संघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत यांच्या विरुद्ध भाजपचे माजी खासदार ए.टी नाना पाटील यांनी आज अपक्ष त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉ. संभाजी पाटील यांनी सुद्धा आज त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला
अहिल्यानगर (दक्षिण) जिल्हा- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी राहुल जगताप (राष्ट्रवादी शरद पवार गट) (अपक्ष अर्ज दाखल),
शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघ- चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी अजित पवार गट)(अपक्ष अर्ज दाखल)
नाशिक- नांदगाव विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी सुहास कांदे यांच्यां विरोधात बंडखोरी करत नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली आहे.
इगतपुरी मतदार संघात महाविकास आघाडीने लकी जाधव यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसच्या माजी आमदार आणि सध्याच्या शिवसेना नेत्या निर्मला गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली.
महायुतीकडून हिरामण खोसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते काशिनाथ मेंगाळ यांनी बंडखोरी करत मनसेत प्रवेश करून खोसकर यांना आव्हान दिले आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला
मालेगाव बाह्य मतदारसंघातून भाजपचे युवा प्रदेश सचिव कुणाल सुर्यवंशी यांनी महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्या विरोधात बंडखोरी केली...
मालेगाव मध्य मतदारसंघात समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद निहाल अहमद यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार एजाज बेग, अजीज बेग यांच्या विरोधात बंडखोरी केली...
शिंदखेडा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे श्याम सनेर यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज सादर केला
शिरपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली आहे
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ- राष्ट्रवादी राहुल जगताप (राष्ट्रवादी शरद पवार गट) (अपक्ष अर्ज दाखल)
--------------------------------------
कोकण- बंडखोरी
--------------------
सिंधुदुर्गातील सावंतवाडी मतदारसंघात महायुतीत बंडखोरी, भाजपचे प्रदेश युवा उपाध्यक्ष विशाल परब यांचा सावंतवाडीतून अपक्ष उमेदवार अर्ज दाखल.शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात महायुतीत बंडखोरी
सिंधुदुर्ग- भाजप मधून विशाल परब यांनी बंडखोरी करत अपक्ष तर शरद पवार राष्ट्रवादी मधून अर्चना घारे परब यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला
रत्नागिरी- गुहागर- भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांची बंडखोरी...
रत्नागिरी संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघ भाजपाचे माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी बंडखोरी करत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. महायुतीकडून उदय सामंत यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात धनुष्यबाण आणि मशाल यांच्यात होणार आहे
-------------------------------
मराठवाडा- बंडखोरी
------------------------
बीड- पक्षाकडून डावलण्यात आल्यानंतर लक्ष्मण पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, आष्टी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या ऐवजी या ठिकाणी भाजपला ही जागा सोडण्यात आली आणि भाजपकडून सुरेश धस यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे..
पक्षाकडून डावलण्यात आल्यानंतर बाळासाहेब आजबे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला
हिंगोली- हिंगोली विधानसभेत उद्धव ठाकरे यांनी रूपाली पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसचे भाऊ पाटील गोरेगावकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. आघाडीमध्ये परंपरागत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असतो
वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीत बंडखोरी पाहायला मिळत आहे. चंद्रकांत नवघरे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीकडून उमेदवारी दिली असताना शिवसेनेचे राजू चापके भाजपच्या उज्वला तांबाळे आणि भाजपचे नेते मिलिंद यंबल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
------------------------------
मुंबई- नवी मुंबई- बंडखोरी
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ- शिंदे गटात बंडखोरी- स्वीकृति शर्मा वि. मुरजी पटेल
मुंबई- महायुतीत वांद्रे पूर्वे विधानसभेत बंडखोरी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली माञ शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर अपक्ष लढणार
नवी मुंबई - बेलापुर विधानसभेत महाविकास आघाडीत बंडखोरी. संदीप नाईक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने मंगेश आमले भरणार अपक्ष अर्ज