Sharad Pawar NCP Candidate List 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दुसरी यादी आज जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी 22  उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये परांडा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या राहुल मोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान आमदार आणि मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याविरोधात त्यांचा सामना होणार आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिल्या यादीत 45 उमेदवारांच्या नावांचा घोषणा करण्यात आली होती. आद जयंत पाटील यांनी 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये अद्यापही काही मतदारसंघातील नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, शरद पवार गटानं या जागेवर दावा केला होता. त्यामुळं ठाकरे गटानं माघार घेतल्याचं बोललं जात आहे. आता परांडा मतदारसंघातून तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे असा सामना होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो देतील तेच काम करणार असल्याची भूमिका रणजित पाटील यांनी मांडली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आज जाहीर केलेल्या 22 उमेदवारांची नावे


1. 16 एरंडोल सतीश अण्णा पाटील 
2. 111 गंगापूर सतीश चव्हाण 
3. 135 शहापूर पांडुरंग बरोरा
4. 243 परांडा राहुल मोटे 
5. 230 बीड संदीप क्षीरसागर 
6. 44 आर्वी मयुरा काळे 
7. 116 बागलान दीपिका चव्हाण 
8. 119 येवला माणिकराव शिंदे 
9. 120 सिन्नर उदय सांगळे
10. 122 दिंडोरी सुनीता चारोस्कर 
11. 123 नाशिक पूर्व गणेश गीते
12. 141 उल्हासनगर ओमी कलानी 
13. 195 जुन्नर सत्यशील शेरकर 
14. 206 पिंपरी सुलक्षणा शीलवंत 
15. 211 खडकवासला सचिन दोडके
16. 212 पर्वती अश्विनीताई कदम 
17. 216 अकोले श्री अमित भांगरे 
18. 225 अहिल्या नगर शहर अभिषेक कळमकर 
19. 254 माळशिरस उत्तमराव जानकर 
20. 255 फलटण दीपक चव्हाण 
21. 271 चंदगड नंदिनीताई भाबुळकर कुपेकर 
22. 279 इचलकरंजी मदन कारंडे


शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज (दि.26) 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी देखील जाहीर करण्यात येणार आहे. जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळपर्यंत तिसरी यादी जाहीर करु असे सांगितले आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तिसऱ्या यादीत कोणाचा नंबर लागतो हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. कारण अनेक मतदारसंघातील उमेदवारांची नावे शरद पवार गटाने गुलदस्त्यात ठेवली आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Sharad Pawar NCP Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; छगन भुजबळांविरोधात उमेदवार ठरला,माळशिरस, परांड्यात कोणाला तिकीट?