Taurus Horoscope 24 October To 03 November 2024 : नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा फार खास असणार आहे. कारण या आठवड्यात दिवाळी असल्या कारणाने काही राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आणि नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा वृषभ राशीसाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या पार्टनरच्या भावनांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या लोकांपासून तुम्हाला तणाव जाणवतोय त्या लोकांपासून तुम्ही दूर राहणं गरजेचं आहे. चॉक्सिक रिलेशनशिपपासून दूर राहा. एखाद्या नात्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला फार वेळ लागेल. 


वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)


करिअरच्या दृष्टीने नवीन आठवडा तुमच्यासाठी काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुम्ही ऑफिसमध्ये बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करा. तसेच, ऑफिस मॅनेजमेंटमध्ये तुमची इमेज चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, जे लोक सेल्स आणि मार्केटिंग फिल्डमध्ये आहेत त्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. तसेच, पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करताना थोडं सतर्क राहा. 


वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)


नवीन आठवडा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या संपन्न करणारा असणार आहे. या आठवड्यात देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, कामानिमित्त जे लोक नवीन लोकेशनवर व्यवसाय करण्याचा विचार करतायत त्यांच्या आत्मविश्वासात अधिक वाढ होईल. 


वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)


नवीन आठवड्यात मेष राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. या आठवड्यात तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच, आरोग्याशी संबंधित तुम्हाला अनेक तक्रारी जाणवतील. यासाठी तुम्ही तुमच्या डाएटवर भर देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या