Parli Vidhansabha Election : परळी विधानसभेसाठी (Parli Vidhansabha Election) महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. अशातच माजी आमदार संजय दौंड (Sanjay Daund) यांचे नाव देखील चर्चेत आहे. परंतू, शरद पवार गटाने अद्याप बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात केवळ एकच उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या विरोधात नेमका कोणता उमेदवार निवडला जातो? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, पक्ष निर्णय घेत नसल्याने संजय दौंड यांनी पुढील दोन दिवसात कार्यकर्त्यांना विश्वासात घेत निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.


बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाला महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे स्थान आहे. या मतदारसंघावर आतापर्यंत मुंडे घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळीत भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. यंदा पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यामुळे धनंजय मुंडे हे अजित पवार गटाकडून परळी मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवार गटातून कोण उभे राहणार, याबद्दल उत्सुकता आहे. शरद पवार गटाकडून परळीतून भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. तसेच संजय दौंड यांच्या नावाची देखील चर्चा आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव करत शरद पवार गटाकडून निवडून आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.


मराठा आरक्षण आंदोलनामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली


मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि जातीय समीकरणे बदलली आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे आणि मराठा फॅक्टरमुळे बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे हे निवडणुकीला उभे होते. मराठी विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे बीड लोकसभेची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. तसाच प्रकार आता परळी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. 


महत्वाच्या बातम्या:


Parli vidhan sabha: धनंजय मुंडेविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, परळी मतदारसंघात भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात?