Sada Saravankar : शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हे माहिम विधानसभा (Mahim Assembly) मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. संध्याकाळी सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर देखील सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. उद्या ठरल्याप्रमाणे ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  


राज ठाकरे रात्री 11 ते 11:30 वाजता मुख्यमंत्र्यांची भेच घेणार 


माहिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात आहेत. त्यांचा शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा सामना होणार आहे.  दरम्यान, राज ठाकरे रात्री 11 ते 11:30 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. यावेळी माहीम विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा होणार आहे.


मनसे-शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू


विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईतील वरळीनंतर आता माहीम विधानसभा मतदारसंघ सर्वात लक्षवेधी ठरला आहे. कारण, येथील मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांच्या रणांगणात उतरले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेविरुद्ध महायुतीकडून विधानसभेला उमेदवार देण्यात आला आहे. माहीम मतदारसंघात शिवसेना उमेदवार सदा सरवणकर हे अमित ठाकरे  निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे, मनसे-शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर ह्यांनी पडत्या काळात आपली साथ दिल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तर, अमित ठाकरे हे आपल्याच घरातील मुलगा असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटंलय. या चर्चेदरम्यान, आता सदा सरवणकर यांनी थेट वर्षा बंगला गाठला होता. त्यामुळं माहीमबाबात काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.


अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना आपली भूमिका मांडली होती. सदा सरवणकर म्हणाले, आशिष शेलार आणि राज साहेबांची एक चांगली मैत्री आहे. आता मैत्रीसाठी त्यांनी जर काहीतरी स्वतंत्र बोलले असतील तर तो त्यांचा भाग आहे. मी सोमवारी जाऊन अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.


महत्वाच्या बातम्या:


सदा सरवणकर वर्षा बंगल्यावर, शिंदे-फडणवीसांशी चर्चा; अमित ठाकरेंसाठी महायुतीचा 'राज'मार्ग