Investment Plan News : अलीकडच्या काळात गुतंवणुकीचं (Investment) महत्व दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासून केलेली गुंतवणूक फायद्याची ठरते. अनेकांचे करोडपती (millionaire) होण्याचे स्वप्न असेत. पण तुम्ही जर योग्य नियोजन केलं तर कमी पगार असूनही तुम्ही करोडपती होऊ शकता. तुम्हाला जर महिना 25000 रुपये पगार असेल तर तुम्ही देखील करोडपती होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 70:15:15 फॉर्म्युल्याचा वापर करावा लागणार आहे. 


नेमका काय आहे 70:15:15 फॉर्म्युला?


70:15:15 फॉर्म्युल्याचा वापर करुन तुम्ही करोडपती होऊ शकता. निवृत्तीनंतर तुमच्याकडे मोठा निधी असणार आहे.  समजा तुम्ही दरमहा 25000  रुपये कमावत आहेत. या उत्पन्नाचा काही भाग वाचवणे महत्त्वाचे आहे. 70:15:15 नियम तुम्हाला हे करण्यास मदत करेल. तुमच्या पगारातील 70 टक्के निधी अत्यावश्यक दैनंदिन खर्चासाठी वापरा, 15 टक्के इमर्जन्सी फंड तयार करा आणि उर्वरित 15 टक्के दरमहा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये ठेवा.


दरमहा 25000 रुपये कमावल्यास पैशांचं नियोजन कसं कराल?


राहण्याच्या खर्चासाठी 70 टक्के म्हणजेच अत्यावश्यक खर्चासाठी 17,500 रुपये


आपत्कालीन निधीसाठी 15 टक्के म्हणजेच दरमहा 3,750 रुपये


SIP गुंतवणुकीसाठी 15 टक्के, उर्वरित 3,750 रुपये दरमहा SIP मध्ये गुंतवले जातील.


कसा मिळेल परतावा?


तुमचा पगार दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढतो असे गृहीत धरून, नंतर स्टेप-अप SIP फॉर्म्युला वापरून, तुम्ही 13 टक्के वार्षिक रिटर्नसह 2.41 कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता. तुम्ही 30 वर्षांसाठी दरमहा 3,750 रुपये गुंतवण्यास सुरुवात केल्यास, तुमचे SIP योगदान वार्षिक 5 टक्क्यांनी वाढवल्यास आणि 13 टक्के वार्षिक परतावा गृहीत धरल्यास, तुम्ही एकूण 29,89,748 रुपये जमा होतील. यावर 13 टक्के रिटर्नसह, तुमचा एकूण नफा सुमारे 2,11,80,645 रुपये होईल. त्याचवेळी, 30 वर्षांनंतर तुमची गुंतवणूक अंदाजे 2,41,70,394 रुपयांपर्यंत वाढू शकते. याचा मोठा पायदा तुम्हाला मिळेल.


तुमच्याकडील पैशांचं योग्य नियोजन करा, कमी कालावधीत करोडपती व्हा


दरम्यान, ज्यांना कमी पगार आहे, ते करोडपती होऊ शकत नाहीत हा गैरसमज आहे. हा गैरसमज सोडून देऊन, तुम्ही जर तुमच्याकडील पैशांचं योग्य नियोजन केलं तर तुम्ही देखील करोडपती होऊ शकता. याचासाठी तुमच्याकडे येणाऱ्या पैशांची योग्य वेळी योग्य बचत होणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही 70:15:15 या फॉर्म्युल्याचा वापर करु शकता. कमी कालावधीत तुम्हाला या माध्यमातून मोठा नफा मिळेल. 


महत्वाच्या बातम्या:


शेअर्समध्ये पैसे बुडतायेत? नेमकं काय करावं? 'या' योजनेत गंतवणूक करा, फक्त व्याजातून 12 लाख मिळवा