Mahadev Jankar : भाजप (BJP) तुमच्याकडे ताकद आहे तोपर्यंत तुम्हाला वापरते, भाजपने माझे आमदार फोडले आहेत. माझा भाजपसोबतचा अनुभव वाईट असल्याची टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar)  यांनी केली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि अजितदादांनी (Ajit Pawar) सावध वागावं असेही जानकर म्हणाले. जात्यातल सुपात यायला वेळ लागत नाही असेही ते म्हणाले. 


माझ्याही बॅगा तपासल्या आहेत. तपासणारे बिहार झारखंडचे होते असेही महादे जानकर म्हणाले. महायुतीने न बोलावल्यामुळं आपला मतदार वाढवण्यासाठी मी स्वबळावर लढत असल्याचे जानकर म्हणाले. एक वेळेला बीजेपी सोबत कोणीच नव्हतं आता काँग्रेस सोबत कोणी नाही. बीजेपी आणि काँग्रेस छोट्या पक्षांना खाणारे पक्ष असल्याची टीका जानकरांनी केली.  


भाजपने माझे आमदार फोडले 


महायुतीने मला बोलावलं नाही, त्यामुळे मी तिकडे गेलो नाही. स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचे जानक रम्हणाले. भारतीय जनता पार्टी ही तुमची ताकद घेऊन तुम्हाला वापरणारी पार्टी आहे. माझे आमदार यांनी फोडले त्यामुळे माझ्यासोबत भाजपाचा अनुभव अत्यंत वाईट असल्याचं त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे आणि अजित दादांनी सावध वागावं स्वतःच्या पक्षाची किंमत वाढवावी असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणीत केले आहे.  


निवडणूक आयोजानं सर्वांनाच समान न्याय द्यावा


महादेव जानकर हे आज परभणी दौऱ्यावर आहेत. परभणीतील त्यांच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ ते विविध ठिकाणी भेटी देत आहेत, बैठका घेत आहेत. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. माझ्याही बॅगा तपासण्यात आल्या, तपासणारे अधिकारी हे झारखंड आणि बिहारचे होते. निवडणूक आयोजानं सर्वांनाच समान न्याय द्यावा, अशी मागणीही महादेव जानकर यांनी केली.


विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीला मोठा धक्का बसला होता. कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवत आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर नाराज असल्याची चर्चा होती. महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.   


महत्वाच्या बातम्या:


Mahadev Jankar : महादेव जानकरांचा नादच खुळा, पक्षात अभिनेत्रीची एन्ट्री, उत्सुकता ताणली; कोणत्या मतदारसंघातून लढणार?