Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, असे अनेक पक्ष आणि आघाड्या मैदानात उतरल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत अनेक मतदारसंघात मतविभाजन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यानिवडणुकीत कोणाला यश मिळू शकतं, याबाबतचा टुडे चाणक्यचा एक्झिट पोल समोर आलाय.
टूडे चाणक्यच्या एक्झिट पोल नुसार कोणत्या आघाडीला किती जागा?
भाजप-महायुतीला - 175 जागा मिळू शकतात. यामध्ये 10 जागा वाढू शकतात, किंवा 10 जागा कमी देखील होऊ शकतात. काँग्रेस-महाविकास आघाडीला - 100 जागा मिळू शकतात. 100 जागांमध्ये 10 जागा वाढू देखील शकतात, कमी देखील होऊ शकतात. इतर पक्ष -आघाडी - 13 जागा मिळू शकतात. यामध्ये 5 जागा वाढू शकतात, किंवा 5 जागा कमी देखील होऊ शकतात.
भाजप - मतांची टक्केवारी - 45 टक्के - यामध्ये 3 टक्क्यांची वाढ होऊ शकते. किंवा 3 टक्के मतं कमी देखील होऊ शकतात. काँग्रेस - मतांची टक्केवारी - 39 टक्के - यामध्ये 3 टक्क्यांची वाढ होऊ शकते. किंवा 3 टक्के मतं कमी देखील होऊ शकतात. इतर पक्ष -आघाडी - 16 टक्के ... - यामध्ये 16 टक्क्यांची वाढ होऊ शकते. किंवा 16 टक्के मतं कमी देखील होऊ शकतात.
टूडे चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला झटका
टूडे चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला जोरदार फटका बसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर महायुती पुन्हा एकदा बहुमत मिळवत सत्ता मिळवेल, असा एकंदरीत एक्झिट पोलचा अंदाज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावे लागेल, अशी चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यात सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान
विधानसभा निवडणुकीत यंदा राज्यात सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतांचा टक्का वाढल्याचं दिसतं. अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचं चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळालं. त्यामुळे जादा झालेलं मतदान कोणाच्या पारड्यात गेलं? आणि या निवडणुकीत कोणाला धक्का बसणार? हे 23 डिसेंबरला होणाऱ्या मतदानातच स्पष्ट होईल.
Maharashtra 2024 Seat Projection
BJP+ 175 ± 11 Seats
Cong+ 100 ± 11 Seats
Others 13 ± 5 Seats
#TCAnalysis Maharashtra 2024
Vote Projection
BJP+ 45% ± 3%
Cong+ 39% ± 3%
Others 16% ± 3%
#TodaysChanakyaAnalysis
इतर महत्त्वाच्या बातम्या