मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं आहे.  गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. आज एक्सिस माय इंडिया या संस्थेनं केलेल्या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला सहज बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात महायुतीला जोरदार समर्थन मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा  या विभागामध्येच महायुती बहुमताचा आकडा पार करेल असा अंदाज एक्सिस माय इंडियानं वर्तवला आहे. 288 जागांपैकी महायुतीला 178-200 जागा मिळतील, असा अंदाज एक्सिस माय इंडियानं वर्तवला आहे. तर मविआला या पाच विभागात 82-102 जागा मिळतील, असा अंदाज या सर्व्हेनं वर्तवला आहे. 


कोणत्या विभागात कुणाला किती जागा मिळणार? 


Axis My India Maharashtra Exit Poll


मुंबई (36 जागा)


महायुती  :22 
मविआ : 14
वंचित :0
इतर : 0
-----------


मतांची टक्केवारी


महायुती :  45 %
मविआ : 43%
वंचित : 2%
इतर : 10%



==============


कोकण-ठाणे (39 सीट्स)


महायुती : 24 
मविआ : 13
वंचित : 0
इतर : 2
-----------


मतांची टक्केवारी
महायुती : 50 %
मविआ : 33%
वंचित : 2%
इतर : 15%


==============


मराठवाडा (46 सीट्स)


महायुती : 30  
मविआ : 15
वंचित : 0
इतर : 1
-----------
मतांची टक्केवारी
महायुती : 45 %
मविआ : 38%
वंचित : 5%
इतर : 12%


उत्तर महाराष्ट्र  (47 जागा)


महायुती : 38
मविआ : 7
वंचित : 0
इतर : 2
-----------
मतांची टक्केवारी
महायुती :  53 %
मविआ : 32%
वंचित : 2%
इतर : 13%


पश्चिम महाराष्ट्र  (58 सीट्स)


महायुती :  36
मविआ : 21
वंचित : 0
इतर : 1
-----------
मतांची टक्केवारी


महायुती :  48 %
मविआ : 41%
वंचित : 2%
इतर: 9%


-----------


विदर्भ : 62 जागा


महायुती :  39
मविआ : 20
वंचित : 0
इतर : 3
-----------
मतांची टक्केवारी


महायुती :  48 %
मविआ : 36%
वंचित : 3%
इतर: 13%


महायुतीची सरशी 


एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार विदर्भातील 62 जागा वगळता 150 जागा मिळत असून त्यांना बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीला पाच विभागात केवळ 76 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  महायुतीला  पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज एक्सिस माय इंडियानं वर्तवला आहे.


एक्सिसच्या पोलनुसार महाविकास आघाडीला जोरदार धक्का 


एक्सिस माय इंडियाच्या पोलनं  288 जागांचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीला 288 पैकी केवळ 82-102 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई वगळता इतर ठिकाणी फार यश मिळत नसल्याचा अंदाज एक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. इतरांना 6-12 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


इतर बातम्या :