Sangola Vidhansabha Election result 2024 : सांगोला विधानसभा (Sangola Vidhansabha) मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघातून काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल या त्यांच्या वाक्यानं प्रसिद्ध असणारे शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे दीपक साळुंखे पाटील (Deepak Aaba Salunkhe patil) तर शेकपकडून बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) हे मैदानात होते. अत्यंत चुरशीच्या या लढतीत या लढतीत शेकापचे बाबासाहेब देशमुखांनी बाजी मारली आहे. हा शहाजीबापू पाटील आणि दिपकआबा साळुुंखे पाटील यांना मोठा दणका बसला आहे. शहाजीबापू पाटील यांच्यासह दीपकआभा साळुंखे पाटील या दोघांनी देखील सांगोल्यातून विजयाचा दावा केला होता. मात्र, दोघांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. अखेर शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी मैदान मारलं आहे.
शहाजीबापू पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई
राज्यात यंदा महायुती व महाविकास आघाडी उदयास आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वेगळीच रंगत असून जोरदार चुरसही पाहायला मिळणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शहाजी बापू पाटील मैदानात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे पाटील मैदानात आहेत. तर शेकापकडून अनिकेत देशमुख मैदानात आहेत. सांगोला मतदारसंघ हा पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाचा राहिला आहे. येथील मतदारसंघात माजी आमदार आणि दिवंगत शेकाप नेते गणपत देशमुख यांनी तब्बल 11 वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रम केला आहे. मात्र, गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारसंघातून शिवसेना युतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना विजय मिळाला होता. शहाजी पाटील यांना 99,464 मतं मिळाली असून केवळ 768 मताधिक्यांनी ते आमदार बनले. पाटील यांनी शेकापच्या डॉ. अनिकेत देशमुख यांचा पराभव केला होता. अनिकेत देशमुख हे गणपत देशमुख यांचे नातू असून त्यांचा 2019 ला निसटता पराभव झाला होता. त्यामुळे, यंदाही विधानसभेच्या रणांगणात देशमुख कुटुंबीयांनी आपली ताकद लावली आहे.
3 लाख 29 हजार मतदार
सांगोला विधानसभा मदारसंघात एकूण 3 लाख 29 हजार 48 मतदारसंख्या आहेत. त्यापैकी, 1 लाख 70 हजार 690 पुरुष मतदार असून 1 लाख 58 हजार 353 स्त्री मतदार आहेत. मतदारसंघातील तृतीयपंथी मतदारांची संख्या 5 एवढी आहे. तसेच, मतदारसंघात एकूण 305 मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया पार पडत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Sangola Vidhansabha : लक्षवेधी सांगोल्यात शहाजी बापू विजयाचा डोंगार चढणार, की महाविकास आघाडी गुलाल उधळणार