मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024 Result) निकालाची उत्सुकता लागली होती. आज या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाली आहे. या निवडणुकीत परभणी (Parbhani District Vidhan Sabha Election 2024 Result) जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघ आहेत. येथे या चारही मतदारसंघांत अटीतटीची लढत झाली. दरम्यान, आता या सर्वच मतदारसंघांचा निकाल स्पष्ट झाला आहे.


परभणी मतदारसंघात काय स्थिती?


परभणी मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राहुल पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आनंद  भरोसे यांच्यात लढत झाली. नासीर शेख हे अपक्ष उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिले.


गंगाखेड मतदारसंघात नेमकं काय घडलं? 


गंगाखेड मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे विशाल कदम आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांच्यात प्रमुख लढत झाली. वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून सीताराम घनदाट यांनी निवडणूक लढवली. ते तिसऱ्या स्थानावर राहिले.


पाथरी मतदारसंघाचं नेमकं काय झालं?


पाथरी मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि काँग्रेस पक्षाचे सुरेश वरपूडकर यांच्यात प्रमुख लढत झाली. राष्ट्रीय समाज पक्षाचे सईद खान हे तिसऱ्या स्थानावर राहिले.


जिंतूर मतदारसंघाची काय स्थिती?


जिंतूर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या मेघना बोर्डीकर आणि शरद पवार यांच्या पक्षाचे विजय भांबळे यांच्यात प्रमुख लढत झाली. तिसऱ्या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे होते.


परभणी जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी 


1) परभणी- राहुल पाटील (शिवसेना-उद्धव ठाकरे गट)


2) गंगाखेड- रत्नाकर गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष)


3) पाथरी- राजेश विटेकर- राष्ट्रवादी (अजित पवार गट)


4) जिंतूर- मेघना बोर्डीकर- भाजपा


परभणीत एकूण चार मतदारसंघ


परभणी जिल्ह्यात एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. परभणी, पाथरी, गंगाखेड आणि जिंतूर अशी या मतदारसंघांची नावे आहेत. या चारही मतदारसंघांत एकूण 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात आहेत. 


कोण किती जागांवर आघाडीवर?


भाजपा-139


शिवसेना (एकनाथ शिंदे)- 54 


राष्ट्रवादी (अजित पवार)- 40


शिवसेना (ठाकरे गट)- 20


राष्ट्रवादी (शरद पवार)- 13


काँग्रेस-19


हेही वाचा :


Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 आज; गुलाल कुणाचा? सत्तेच्या चाव्या कुणाकडे? काही तासांत स्पष्ट होणार...


Parbhani Assembly Election : परभणी जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोणाची बाजी? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!


Jalna Assembly Election : जालना जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोणाची बाजी? 5 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!