मुख्यमंत्रिपद कोणाला द्यावं, यात संघाची कोणतीही भूमिका नाही, संघाच्या वरिष्ठ अष्टकातील विश्वसनीय सूत्रांची माहिती
अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील रेसिनो ड्रग्स कंपनीत आज संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास मोठा स्फोट झाल्याची घटना घडली
मनसे बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम बाबात प्रश्न उपस्थित
राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएम बाबात जाणून घेतली मते
भाजप सोबत जाणं ही सुद्धा चूक झाली उमेदवारांकडून राज ठाकरेंसमोर स्पष्ट नाराजी
मनसे बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम बाबात प्रश्न उपस्थित
राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएम बाबात जाणून घेतली मते
भाजप सोबत जाणं ही सुद्धा चूक झाली उमेदवारांकडून राज ठाकरेंसमोर स्पष्ट नाराजी
अजित पवार यांचं एक आज विधान आलंय
कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो
हे आज दिसून आलंय
मी महायुतीचा धर्म पाहण्यासाठी अजित पवारांकडे मागणी करत होतो
मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं असं ते बोलले म्हणजे हा सुनियोजित कट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका हिंदुत्वाची
मुख्यमंत्रीपद कोणाला द्यावं, यात संघाची कोणतीही भूमिका नाही
संघाकडून तत्वनिष्ठ हिंदुत्वाचा पुरस्कार, व्यक्तीसापेक्ष भूमिका नाही
मुख्यमंत्री पद वगैरे निर्णय भाजप घेणार
संघाच्या वरिष्ठ अष्टकातील विश्वसनीय सूत्रांची माहिती
- नाशिक जिल्ह्यातील चार माजी आमदारांसह १०८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त...
- नाशकातील सर्वच विजयी उमेदवारांनी मिळवली एक लाखापेक्षा अधिकची मते...
- माजी आमदार शिरीष कोतवाल, निर्मला गावित, दीपिका चव्हाण, काशिनाथ मेंगाळ या चार माजी आमदारांचे झाली अनामत रक्कम जप्त...
- नाशिक जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील १०८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिलेला नाही
या संदर्भातील बातम्या असत्य असून खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिलेला नाही
या संदर्भातील बातम्या असत्य असून खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत
- नागपूरात अनिल देशमुख यांच्या घरासमोर लागले पवार गटाला डिवचणारे होर्डिंग्ज
- “महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार”
- “तुतारीच्या नवनियुक्त १० आमदारांचेही आता अजीत दादा हेच वाली”
ते काम सुरु आहे असं म्हणत मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या आमदारांना विश्वास दिला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही माझी भावना आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
ताज हॉटेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदारांची बैठक सुरू
मुख्यमंत्री वांद्रेमधील ताज हॉटेलमध्ये दाखल
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर
सूत्रांच्या माहितीनुसार पूर्ण बहुमताचे सरकार असल्याने कोणतीही घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार
26 तारखेला जरी या सरकारची मुदत संपत असली तरी एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार
तोपर्यंत राज्यात आणि केंद्रात चर्चा पूर्ण करून 28 ते 29 तारखेपर्यंत सत्ता स्थापन होण्याची शक्यता
पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांची कराडमधील व्हीट्स सत्यजित हॉटेलमध्ये कमराबंद बैठक सुरू झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी निवृत्त सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा राखली पाहिजे,असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य चांगलं राहिलं पाहिजे, राज्याचा नावलौकिक कायम राहिलं यासाठी काम करणं गरजेचं : शरद पवार
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला असता तर फारसा फायदा झाला नसता, असं शरद पवार यांनी म्हटलं.
नव्या सरकारच्या शपथविधीबाबत उपस्थित राहणार का असं विचारलं असता संसदेचं सत्र सुरु होत असल्यानं उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं.
पुढच्या काळात जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती निवडणुका होत आहेत, त्या तयारीनं लढणार आहे, असं शरद पवार म्हणाले.
आमच्या सोबत जी युवा पिढी करते त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लक्ष केंद्रीत करणार, असं शरद पवार म्हणाले.
बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळं ध्रुवीकरण झालं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सत्तेत आलो नाही तर लाडकी बहीण योजना बंद होईल असा प्रचार सत्ताधाऱ्यांनी केला, असं शरद पवार म्हणाले.
Maharashtra Election 2024: ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची उद्या मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे.
दुपारी साडेबारा वाजता सर्व नवीन आमदारांची बैठक
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांसोबत चर्चा होणार
Ahilyanagar News : नगर शहर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यावेळी त्यांना मंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा नगरकरांकडून व्यक्त होत आहे. नगर शहरातील प्रोफेसर चौकात संग्राम जगताप यांची आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर 'मंत्री महोदय' असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशिरा आमदार संग्राम जगताप यांना मुंबई इथे तातडीनं बोलून घेतलं आहे. नगर शहर मतदारसंघाला मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे.
NCP MLA : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचा सूर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे आमदार ठराव पास करुन भूमिका घेणार असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपचे दिल्लीतून निरीक्षक आल्यानंतर यावर निर्णय होणार आहे. मात्र, त्या आधीच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीतून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या संदर्भात सूर असल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra Election 2024 : तानाजी सावंत यांच्या निवडून येण्यानं धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांच्या प्रचार सभेत बोलताना तुम्ही तानाजीरावांना आमदार करा, मी नामदार करतो हा शब्द दिला होता.
धाराशिव, लातूर, बीड ,सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एकमेव आमदार निवडून आला. परांडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांचा दीड हजार मतांनी विजय केला.
शरदचंद्र पवार गटाचे पराभूत उमेदवार राहुल मोटे यांच्या आक्षेपानंतर रात्री उशिरा विजय घोषित प्रमाणपत्र करत दिले.
Nagpur Election 2024 : नागपूर : 'देवा भाऊ' भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे होर्डींग नागपूरच्या धरमपेठ परिसरात लावण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग लावले आहेत. धरमपेठ परिसरातील झेंडा चौकात असाच एक होर्डिंग येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, धरमपेठ परिसर देवेंद्र फडणवीस यांचा पत्रक निवास असलेला परिसर आहे...
Hingoli News : हिंगोली जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रचार काळात वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून सभा घेण्यात आल्या वसमतमध्ये शरद पवार यांची सभा झाली तर कळमनुरीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली तरी मात्र महाविकास आघाडीला अपेक्षित असं यश मिळालं नाही, याचा अर्थ या सभांचा कोणताही परिणाम मतदारसंघातील जनतेवर झालेला पाहायला मिळत नाही. या उलट वसमतमध्ये महायुतीच्या एकाही नेत्यांनी सभा घेतली नाही आणि कळमनुरी मध्येही महायुतीच्या एकाही नेत्याची सभा झाली नाही. या दोन्ही मतदारसंघांमध्ये सभा न घेता महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत, कळमनुरीमधून संतोष बांगर तर वसमतमधून राजू भैया नवघरे यांचा विजय झालेला आहे.
Mumbai News : घाटकोपरमध्ये एक तरुणी एक तरुणाबरोबर पळून गेली होती, घरातून तिने काही पैसे ही नेले होते. हा प्रकार लव्ह जिहाद असून संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा उद्या पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आज किरीट सोमय्या यांनी या तरुणीच्या कुटुंबासह घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. व्होट जिहाद, लँड जिहाद बंद करा जर पोलिसांनी या प्रकरणात पॉस्कोचा गुन्हा दाखल केला नाही, तर पोलिसांना धडा शिकवणार नाही, तर 24 तासानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.
Solapur Vidhan Sabha Election 2024: सोलापुरातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांनी बाजी मारली. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांचा तब्बल 30 हजार मतांनी पराभव राजू खरे यांनी केलाय. यशवंत माने यांच्या पाठीमागे माजी आमदार राजन पाटील यांच्या सारखा दिग्गज नेता असताना ही त्याना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान राजू खरे यांच्या विजयात अजित पवार गटाचे माजी प्रवक्ते उमेश पाटील यांचा मोठा वाटा आहे. उमेश पाटील यांनी ‘मोहोळ गुलामगिरीतून मुक्त आणि 23 नोव्हेंबर मोहोळचा स्वातंत्र्य दिन’ अशीच जाहिरात दिलीय.
Nanded Vidhan Sabha Election 2024: राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, त्यात भाजपाला सर्वाधिक 131 जागा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी कार्यकर्त्यांकडून नांदेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. मी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस असा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळतोय. तसेच, रयतेचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो बॅनरवर लावण्यात आला आहे. हे बॅनर प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य महेश खोमणे यांनी लावला आहे.
Maharashtra Election Result : मैत्रीपूर्ण लढतींचा महाविकास आघाडीला मोठा फटका
मविआच्या 21 जागांवर मैत्रीपूर्ण लढती, 17 ठिकाणी फटका
महायुतीच्या 8 जागांवर मैत्रीपूर्ण लढती, दोनच ठिकाणी फटका
शेकाप, समाजवादी पक्ष, डाव्यांच्या उमेदवारांविरोधात मविआच्या लढती
काँग्रेस आणि सपाची 6 जागी लढत, त्यातील 4 जागा भाजपनं जिंकल्या
शेकाप आणि ठाकरे गटात 8 जागी, एका जागी राष्ट्रवादीशी लढत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निकालाचे मविआवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता
संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवर जाता येणार नाही
विधानसभेत विरोधी पक्षनेता नसेल
शरद पवारांच्या जागेवरही राज्यसभेवर कुणाला पाठवता येणार नाही
मविआतील तीन पक्षांना मिळून एकच खासदार राज्यसभेवर देता येईल
Maharashtra Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुंबईत यायला सुरुवात झाली असून ताज लँण्ड्स एंड हॉटेलमध्ये शिंदे गटाचे 29 आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. हाॅटेलमध्येच सर्व आमदारांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची बैठक पार पडणार आहे. अंदाजे संध्याकाळी 6 वाजता सर्व आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत गट नेता निवडला जाणार, तसेच इतर महत्त्वाची पदं दिली जाणार आहेत. उपस्थित आमदारांना मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.
Raj Thackeray's Son Amit Thackeray Defeated: विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेलाही जनतेनं सपशेल नाकारलं. राज ठाकरेंची माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंच्या रूपात प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र स्वतः राहात असलेल्या माहीम मतदारसंघातही राज ठाकरे मुलाला निवडून आणू शकले नाहीत. माहीममध्ये महेश सावंत विरूद्ध सदा सरवणकर विरूद्ध अमित ठाकरे अशी तिरंगी लढत होती. अमित ठाकरेंनी घरोघरी जात प्रचारही केला होता. मात्र प्रचार रॅलींना प्रतिसाद देणाऱ्या दादर माहीमकरांनी मतं मात्र महेश सावंत आणि सदा सरवणकर यांना दिली... अमित ठाकरे थेट तिसऱ्या स्थानी फेकले गेले. अमित ठाकरेंएवढाच मनसेला धक्कादायक निकाल कल्याण ग्रामीण मतदारसंघातला... कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे एकमेव आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील विजयाच्या विश्वासात होते. मात्र शिंदे गटाचे राजेश मोरे यांनी बाजी मारली. वरळीत आदित्य ठाकरेंना आव्हान देणाऱ्या संदीप देशपांडेंना पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर शिवडीत भाजपचा पाठिंबा मिळूनही बाळा नांदगावकरांना फायदा झाला नाही. ठाणे शहर मतदारसंघात अविनाश जाधव, बेलापूर मतदारसंघात गजानन काळे यांचा सोशल मीडियाने बोलबाला केला खरा, मात्र मतदारांनी त्यांना जागा दाखवली.
Ajit Pawar Victory : बारामती अजित पवारांचीच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. अजित पवारांनी बारामतीतून तब्बल 89 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. काका पुतण्याच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. युगेंद्र पवारांच्या पाठिशी शरद पवारांनी संपूर्ण ताकद उभी केली, शरद पवारांनी बारामती मतदारसंघ नातवासाठी अक्षरशः पिंजून काढला, मात्र अजित पवारांच्या जवळपासही फिरकणं युगेंद्र पवारांना शक्य झालं नाही. युगेंद्र पवारांच्या निमित्ताने पवार घराण्यातल्या तिसऱ्या पिढीतला आणखी एक मोहरा तयार करण्याचा शरद पवारांचा मनसुबा अधुरा राहिला. दरम्यान युगेंद्र नवखे असून त्यांना उमेदवारी न देता शिकू द्यायला हवं होतं अस अजित पवारांनी सांगितलंय.
Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरलीये. महायुतीच्या दणदणीत विजयामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचं पहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीतील निकालात अपेक्षित कामगिरी करण्यात मागे पडलेल्या महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही समावेश आहे. याच योजनेचा मोठा फायदा निवडणुकीत झाल्याचं दिसतंय. त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानलेत.
Mahayuti Victory: महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपचाच असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वासनिय सूत्रांनी दिलीय. तर राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हाच पॅटर्न कायम राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे ही प्रमुख पदं राहणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत योग्य सन्मान दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला आहे. भाजपला आतापर्यंतचं मोठं यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला 50 चा आकडा गाठणंही मुश्कील झाल्याचं पाहायला मिळालं. तर महायुतीने 236 जागा जिंकल्या. विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती मिळतेय. 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने एक दिवस आधीच सरकार स्थापन केलं जाणार असल्याचं समजतंय.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. रवींद्र चव्हाण यांनी शेवटच्या टप्प्यात मतमोजणीत बाजी मारली आणि 1457 मतांनी विजय मिळवला.
1. सातारा मतदारसंघ - भाजपा उमेदवार शिवेंद्रराजे भोसले - ०१ लाख ४२ हजार १२४ मताधिक्याने विजयी.
2 . परळी मतदारसंघ - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे - 01 लाख 41 हजार 241 मतांची विजयी
3. दिलीप बोरसे, बागलाण (भाजप)= 129297 मतांनी विजयी
4 . कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ - शिवसेना उमेदवार एकनाथ शिंदे - ०१ लाख २० हजार ३३५ मतांची विजयी
5 . कोथरुड मतदारसंघ - भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील - १ लाख १२ हजार ०४१ मतांची विजयी आघाडी - २१ पैकी २१ राऊंडची मतमोजणी पूर्ण.
6 . ओवळा माजीवड - शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक 1 लाख 9 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी..
7 . मावळ मतदारसंघ - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके - ०१ लाख ०८ हजार ५६५ मतांची विजयी
8 . चिंचवड मतदारसंघ - भाजपा उमेदवार शंकर जगताप - ०१ लाख ०३ हजार ८६५ मतांनी विजयी.
9 . बारामती मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार - 1 लाख 899 मतानी विजयी
10.दादा भुसे, मालेगाव बाह्य (शिंदे गट)= 102440
11 . मुंब्रा कळवा मतदारसंघ - शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड - ९६ हजार २२८ मतांनी विजयी.
12. बोरिवली मतदारसंघ - भाजपा उमेदवार संजय उपाध्याय - ९५ हजार ०५४ मतांची विजयी आघाडी -
विधिमंडळ पक्षाचे गटनेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर पदाधिकारी निवडण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने संमत..
मुंबई :- विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. तर सिद्धेश कदम यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वांधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. या बैठकीला ऑनलाइन उपस्थित असलेले आमदार आणि कार्यकरिणीतील इतर सर्व सदस्यांनी या दोन्ही प्रस्तावांना अनुमोदन देऊन याबाबतचे सर्वांधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेतला.
Sewri Vidhan Sabha Election 2024: मराठी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारानं बाजी मारली आहे. ठाकरेंचे निष्ठावंत अजय चौधरींनी दणदणीत विजय मिळवत, पुन्हा एकदा शिवडी विधानसभेवर भगवा फडकावला आहे.
Maharashtra CM Updates : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 25 तारखेला होण्याची शक्यता
26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार
एबीपी माझाला विश्वनीय सूत्रांची माहिती
Worli Vidhan Sabha Result LIVE: महाविकास आघाडीनं वरळीचा गड राखला असून आदित्य ठाकरेंचा वरळीतून दणदणीत विजय झाला आहे. वरळीत तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा, मनसेकडून संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अखेर आदित्य ठाकरेंनी दोघांचंही आव्हान संपुष्टात आणलं आहे. आदित्य ठाकरेंनी वरळीतून दणदणीत विजय मिळवला आहे.
Mahim Vidhan Sabha Consituncy Result : माहीममध्ये रंगलेल्या तिरंगी लढतीत ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी विजय मिळवला आहे. माहीमची लढत हायव्होल्टेज झाली होती, ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंच्या उमेदवारीमुळे. पण या निवडणुकीत अमित ठाकरेंचा दारुण पराभव झाला आहे. तर, सदा सरवणकरांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत.
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE : अलिबाग मुरुड मतदार संघाचे उमेदवार महेंद्र दळवी विजयाच्या उंबरठ्यावर असल्यानं त्यांनी अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांसोबत विजयाची खून दाखवत जल्लोष केला आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024 : मुंब्रा-कळवा मतदारसंघात जितेंद्र आव्हांनी मोठी आघाडी घेतली आहे. जितेंद्र आव्हाड 95143 मतांनी आघाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती विजयाच्या शिखरावर पोहोचलेली आहे... अशातच राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी चारही जागांवर महायुती जिंकून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या व जवळपास 15 दिवस प्रफुल पटेल गोंदिया जिल्ह्यात तळ ठोकून होते त्याची फलश्रुती मिळाली असून चारही जागांवर महायुती आघाडीवर आहे.
कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांनी मारला विजयी षटकार मारला आहे. कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ विजयी झाले आहे. मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांचा पराभव केला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघांमधून भाजप उमेदवार अतुल भातखळकर विजयी झाले आहेत
Maharashtra Assembly Election Result 2024 : बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार संजय उपाध्याय विजयी झाले आहेत.
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE : बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड 1300 मतांनी विजयी झाले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : वरळी विधानसभा मतदारसंघात 'काँटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. वरळीत आदित्य ठाकरे 3852 मतांनी आघाडीवर आहेत.
Maharashtra Assembly Election 2024 : कर्जत- जामखेड मतदारसंघात बाराव्या फेरीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या रोहित पवारांची 842 मतांची आघाडी आहे, तर भाजपचे राम शिंदे पिछाडीवर आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024 : शिर्डी विधानसभेत भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील 70521 मतांनी विजयी झाले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 LIVE : लातूर शहर विधानसभा मतदारसंघात 12 व्या फेरी अखेर काँग्रेस उमेदवार अमित देशमुख 5000 मतांनी आघाडीवर
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE : परभणी विधानसभा : 13 व्या फेरीअंती स्थिती
राहुल पाटील, ठाकरे गट - 70743
आनंद भरोसे, शिंदे गट - 45577
राहुल पाटील 25166 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : उदगीर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार संजय बनसोडे यांची सर्वाधिक 62 हजाराची लीड घेत विजयी आघाडी घेतली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राजेश विटेकर सहाव्या फेरी अखेर तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : बारामती विधानसभेत विजय मिळत अजित पवारांनी गड राखला.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : बारामती विधानसभेत विजय मिळत अजित पवारांनी गड राखला.
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE : परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार महायुतीचे उमेदवार परळीमध्ये धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी 50,000 हून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : खानापूर विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार सुहास बाबर यांच्याकडून जल्लोषास सुरुवात झाली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : गंगाखेड विधानसभा मतदार संघात रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे 15 व्या फेरी अखेर 1173 मतांनी आघाडीवर आहेत. पाथरी विधानसभा रासपचे सईद खान 13 व्या फेरीअखेर मतांनी आघाडीवर आहेत
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जिंतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार विजय भांबळे 14 व्या फेरी अखेर 4578 मतांनी आघडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघात युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा चौथ्यांदा विजयाच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत रवी राणा 60 हजार मतांनी आघाडीवर आहेत. रवी राणा यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडूनजल्लोष साजरा केला जातोय. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : अहमदनगर शहर मतदारसंघात पंधराव्या फेरी अखेरीस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप 24295 मतांनी आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर पिछाडीवर आहेत.
Jalna Vidhan Sabha Matadarsang : जालना : सहाव्या फेरी अखेरही राजेश टोपे पिछाडीवर गेले आहेत. घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण 6 हजार 100 मतांनी आघाडीवर आहेत. 25 वर्ष सलग आमदार राहिलेले राजेश टोपे पहिल्यांदा पिछाडीवर आहेत. ओबीसी आंदोलनाचा फटका बसला आहे. पंकजा मुंडे यांची शेवटची सभा निर्णायक ठरल्याच्या चर्चा मतदारसंघात होत आहेत.
Worli Election Result 2024 LIVE : वरळीत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. 597 मतांनी आदित्य ठाकरे पिछाडीवर गेले आहेत. तर, मिलिंद देवरांनी आघाडी घेतली आहे.
Aditi Tatkare Victory : अजित पवार गटाच्या नेत्या अदिती तटकरे यांनी आपला विजय नोंदवला आहे.
Worli Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 LIVE : वरळी विधानसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढाई रंगली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघांमध्ये अगदी काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत वरळीमध्ये सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी तब्बल 650 मतांनी आघाडी कायम ठेवली आहे. पण, मताधिक्य फार कमी असल्यामुळे ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे.
Byculla Vidhan Sabha Election 2024 LIVE Updates : मुंबईच्या भायखळा मतदारसंघात पाचव्या फेरी अखेरपर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचं मताधिक्य घटल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मनोज जामसुतकर आणि यामिनी जाधव यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार, यात काही शंका नाही.
पाचव्या फेरीत कुणाला किती मतं?
यामिनी जाधव - 18,793
मनोज जामसुटकर - 17,644
यामिनी जाधव 1149 मतांसह आघाडीवर
Maval Matadarsangh Election Result 2024 LIVE: मावळ मतदारसंघात अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंनी जोरदार मुसंडी मारली आहे. सतराव्या फेरीअखेरीस अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंनी 1 लाख 17 हजार 905 मतांसह आघाडी घेतली आहे. अजित पवार गटाचे सुनील शेळके 72,836 मतांनी आघाडीवर आहेत.
सतरावी फेरी : 166085 मतं
सुनील शेळके (अजित पवार गट) : 117905 मतं
बापू भेगडे (अपक्ष) : 45069 मतं
अजित पवार गटाचे सुनील शेळके 72,836 मतांनी आघाडीवर
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE Updates : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. आतापर्यंतच्या कलांमध्ये महायुतीच्या मैत्रीपूर्ण लढतींचे कल हाती आले आहेत. त्या ठिकाणची परिस्थिती काय?
मोर्शी
उमेश यावलकर (भाजप) आघाडीवर
देवेंद्र भुयार (राष्ट्रवादी अजित दादा)
दिंडोरी (ST)
नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी अजित दादा) आघाडीवर
धनराज महाले (शिवसेना शिंदे)
देवळाली (SC)
सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित दादा) आघाडीवर
राजश्री अहिरराव (शिवसेना शिंदे)
पुरंदर
विजय शिवतारे (शिवसेना शिंदे) आघाडीवर
संभाजी झेंडे (राष्ट्रवादी अजित दादा)
आष्टी
सुरेश धस (भाजप) आघाडी
बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी अजित दादा)
सिंदखेड राजा
मनोज कायंदे (राष्ट्रवादी अजित दादा)
शशिकांत खेडेकर (शिवसेना शिंदे)
राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी शरद पवार) आघाडीवर
मानखुर्द शिवाजीनगर
अबू आझमी ( समाजवादी पक्ष)
नवाब मलिक (राष्ट्रवादी अजित दादा)
सुरेश पाटील उर्फ बुलेट पाटील (शिवसेना)
Bandra East Seat Result 2024 LIVE: मुंबई उपनगरातील वांद्रे पूर्वमध्ये ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत. चौथ्या फेरी अखेरपर्यंतचे आकडे समोर आले आहेत.
कुणाला किती मतं?
झिशान सिद्दीकी : 2060
तृप्ती सांवत : 895
वरूण सरदेसाई : 3484
चौथ्या फेरीनंतर वरूण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून आघाडीवर आहेत.
Maharashtra Newasa Matadarsangh Nikal 2024 : नेवासामध्ये विठ्ठलराव लंघे पाटील 8235 मतांनी आघाडीवर आहेत. पाचव्या फेरी अखेरीचे कल हाती आले आहेत.
कोणाला किती मतं?
शंकरराव गडाख : 4440 मतं
विठ्ठलराव लंघे : 6177 मतं
बाळासाहेब मुरकुटे : 666 मतं
Parli Vidhan Sabha Result LIVE: परळीत अजित पवार गटाचे धनंजय मुंडे 16000 मतांनी आघाडीवर आहेत.
Worli Vidhan Sabha Election 2024 LIVE Updates: वरळी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेरीस आदित्य ठाकरेंनी आघाडी कायम ठेवली आहे. दुसऱ्या फेरीअखेरीस आदित्य ठाकरे 696 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी बाजू पलटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maval Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 LIVE : मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके 52 हजार 993 मतांनी आघाडीवर, तर अपक्ष उमेदवार बापू भेगडे पिछाडीवर आहेत.
मावळ मतदारसंघाचा कल
12वी फेरी : 115038
सुनील शेळके (अजित पवार गट) : 82903
बापू भेगडे (अपक्ष) : 29910
अजित पवार गटाचे सुनील शेळके 52993 मतांनी आघाडीवर
Jalna Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates: जालना : दुसऱ्या फेरी अखेर राजेश टोपे पुन्हा पिछाडीवर , शिवसेनेचे हिकमत उढाण 1835 मतांनी आघाडीवर
Pune Vidhan Sabha Election : आंबेगाव : राष्ट्रवादीच्या दिलीप वळसेंची सातव्या फेरीत 2627 मतांची घट, आता अवघ्या 281 मतांची आघाडी
Mahim Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 LIVE: माहीममध्ये मनसेला मोठा धक्का बसला असून अमित ठाकरे पिछाडीवर गेले आहेत. सध्या ठाकरेंचे महेश सावंत आघाडीवर असून सदा सरवणकर दुसऱ्या स्थानी आहेत. तर, अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी आहेत.
तिस-या फेरी अखेर महेश सावंत आघाडीवर
मनसे - अमित ठाकरे : 4693 मतं
ठाकरे गट-महेश सावंत : 8863 मतं
शिवसेना शिंदे गट - सदा सरवणकर : 6202 मतं
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates : अनेक ठिकाणी पहिल्या फेऱ्या संपल्या असून दुसऱ्या मतमोजणीच्या फेऱ्यांना सुरुवात झाली आहे. पाहुयात कुणाच्या पारड्यात किती मतं?
- बीड विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष उमेदवार योगेश क्षीरसागर चौथी फेरी अखेर 2710 मतांनी आघाडीवर
- गेवराई (राष्ट्रवादी) : अजित पवार विधानसभा विजयसिंह पंडीत 7726 मतांनी आघाडीवर
- केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा आघाडीवर
- फुलंब्री विधानसभा संघातून अनुराधा चव्हाण (भाजप) आघाडीवर
- परतूरमधून दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे बबनराव लोणीकर आघाडीवर
- हिंगोली विधानसभा भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे 3100 मतांनी आघाडीवर
- वसमत राजू नवघरे अजित दादा 8130 मतांनी आघाडीवर
- पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ तिसऱ्या फेकेरी फेरी अखेरीस काँग्रेसचे रमेश बागवे आघाडीवर
- अंबरनाथ : पहिल्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किणीकर 1748 मतांनी आघाडीवर
- कल्याण ग्रामीण : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे 5000 मतांनी आघाडीवर
- कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीनंतर वैभव नाईक 129 मतांनी आघाडीवर
- श्रीवर्धन मध्ये आदिती तटकरे दुसऱ्या फेरीत 9824 मतांनी आघाडीवर
Sewri Vidhan Sabha Election 2024 LIVE Updates: मुंबईतील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या शिवडी मतदारसंघाच्या लढतीत शिवसेना ठाकरे गट आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर पिछाडीवर आहेत.
शिवडी विधानसभेत कोणाला किती मतं?
अजय चौधरी (शिवसेना UBT) : 3628 मतं
बाळा नांदगावकर (MNS) : 3272 मतं
Bandra East Vidhan Sabha Election Result 2024 LIVE: वांद्रे पूर्व मतदार संघांत ठाकरेंच्या वरुण सरदेसांनी आघाडी घेतली आहे. 662 मतांनी वरुण सरदेसाईंनी आघाडी घेतली आहे.
पहिल्या फेरी कोणाला किती मतं?
झिशान सिद्धीकी : 2129
तृप्ती सावंत : 1499
वरूण सरदेसाई : 2791
662 मतांनी शिवसेना ठाकरे गटाचे वरूण सरदेसाई आघाडीवर
Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE : माहीम विधानसभा निवडणूक मतदारसंघात मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलांपासून आघाडीवर असणारे अमित ठाकरे सध्या पिछाडीवर गेले असून आता ठाकरेंच्या महेश सावंत यांनी बाजी मारत आघाडी घेतली आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE Updates : आतापर्यंत अनेक ठिकाणी पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली असून ईव्हीएम मतमोजणीच्या पहिल्या फेऱ्याही पूर्ण झाल्या आहेत. कुठे, कोण आघाडीवर पाहुयात एका क्लिकवर...
- ठाणे : ओवळा माजीवडा : शिवसेनेचे प्रताप सरनाईक 6 हजार 421 मतांनी आघाडीवर
- ठाणे : मुंब्रा कळवा : एनसीपी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड 3 हजार 790 मतांनी आघाडीवर
- मालेगाव मध्यमधून अपक्ष उमेदवार आसिफ शेख एक हजार मतांनी आघाडीवर
- कणकवलीत नितेश राणे पहिल्या फेरीत 1100 मतांनी आघाडीवर
- चाळीसगाव विधानसभेतून भाजपचे मंगेश चव्हाण 2957 मतांनी आघाडीवर...
- सातारा फलटण विधानसभा मतदार संघामधून पहिल्या फेरी अखेर महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार सचिन पाटील 235 मतांनी आघाडीवर
- शेवगाव पाथर्डीत अपक्ष उमेदवार आघाडीवर
- यवतमाळ- पोस्टल मतांमध्ये दिग्रस मतदार संघात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे 600 मतांनी आघाडीवर
- हिंगोली बिग ब्रेकिंग : पहिल्या फेरीमध्ये संतोष बांगर अडीच हजार मतांनी पुढे
- केज पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे पृथ्वीराज साठे यांना 248 मतांची आघाडी
- पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ 1743 मताने आघाडीवर
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 LIVE : बारामतीत काका-पुतण्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीत अजित पवारांना 9291 मतं, तर युगेंद्र पवारांना 5668 मतं मिळाली आहे. तब्बल 3 हजार 623 मतांनी अजित पवार आघाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates : राज्यातील लढतींचे सुरुवातीचे कल हाती येत आहेत. अशातच बऱ्याच ठिकाणी पोस्टल मतमोजणी संपली असून ईव्हीएम मतमोजणी सुरु झाली आहे. अशातच ईव्हीएम मतमोजणीत अनेक दिग्गजांनी बाजी मारली आहे. तर काहीजण पिछाडीवर आहेत.
कोण, कुठे, किती मतांनी आघाडीवर?
- मालेगाव बाह्य (नाशिक) : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मंत्री दादा भुसे 4000 मतांनी आघाडीवर
- टपाली मतमोजणीत छगन भुजबळ पिछाडीवर
- परभणी विधानसभा मतदार संघ : शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आनंद भरोसे 629 मतांनी आघाडीवर
Baramati Matadarsangh Election Resut Updates LIVE Updates: बारामतीत काका-पुतण्याची लढत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाकडून युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पवार कुटुंबात रंगलेल्या हायव्होल्टेज लढतीत काका-पुतण्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पोस्ट मतमोजणीत युगेंद्र पवारांनी बाजी मारलेली. तर, आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
ईव्हीएम मतमोजणीत सध्या अजित पवारांनी बाजी मारली आहे. तर, युगेंद्र पवार पिछाडीवर आहेत. येत्या काही तासांतच बारामतीचा निकाल स्पष्ट होईल.
Election 2024 LIVE Updates: बीडमधून सर्वात मोठी अपडेट; धनंजय मुंडे पहिल्या फेरी अखेर 3000 मतांनी आघाडीवर
राज्यात इतर ठिकाणी कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?
- सातारा - पाटण मतदारसंघातील पोस्टल मतमोजणीत शंभूराज देसाई आघाडीवर
- बुलढाणा : खामगाव मतदारसंघातून आकाश दादा फुंडकर यांना 1524 मतांची आघाडी पहिल्या फेरीमध्ये मिळाली आहे.
- पालघरमध्ये पोस्टल मतदानात महायुतीचे शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित आघाडीवर
- कळवणमध्ये टपाली मतमोजणीत माकपचे जेपी गावीत आघाडीवर
- हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर, पोस्टल मतांच्या फेरीतून चेतन तुपे आघाडीवर
- औसा विधानसभा मतदारसंघ टपाली मतमोजणी सुरुवात, भाजपाचे अभिमन्यू पवार आघाडीवर
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE Updates : राज्यातील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काही दिग्गज आघाडीवर आहेत, तर काही पिछाडीवर पडले आहेत. पाहुयात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर...?
- ठाकरे गटाचे योगेश घोलप आघाडीवर, तर अजित पवार गटाच्या सरोज आहेर पिछाडीवर
- श्रीगोंदा , अहिल्यानगर- पोस्टल मतदानात शिवसेना (UBT) उमेदवार अनुराधा नागवडे या आघाडीवर
- गंगापूर पोस्टल मतदान 111 मत मोजणी प्रशांत बंब आघाडीवर
- चिंचवडमधून पोस्टल मतदानात शंकर जगतापांची आघाडी
- भोसरी मधून पोस्टल मध्ये भाजपचे महेश लांडगे आघाडीवर
- यवतमाळ- आर्णी -केळापूर विधानसभा मतदारसंघात पोस्टल मतमोजणीला सुरवात भाजपचे तर्फे राजू तोडसाम व काँग्रेस तर्फे जितेंद्र मोघे यांच्यात थेट लढत होणार
- आष्टी: पोस्टल मतात भाजपचे सुरेश धस आघाडीवर
- मागठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सुर्वे आघाडीवर
- कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अतुल भातखळकर आघाडीवर
- निलंगा- संभाजीराव पाटील निलंगेकर पोस्टल मतदानात आघाडीवर
- खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून पोस्टल मतमोजणीत ठाकरे सेनेचे बाबाजी काळे आघाडीवर, अजित पवारांच्या दिलीप मोहितेंना धक्का
Mahim Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates : माहीमचा पहिला कल हाती आला आहे. माहीममध्ये पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. माहीममध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये अमित राज ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मनसेच्या गोटात जल्लोष साजरा केला जात आहे.
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 LIVE Updates : पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. तर, महाविकास आघाडीकडून काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
- पिंपरीत पोस्टल मतमोजणीत अण्णा बनसोडे यांची पिछाडी, शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत आघाडीवर
- निफाडमध्ये टपाली मतमोजणीत ठाकरे गटाचे अनिल कदम आघाडीवर, अजित पवार गटाचे दिलीप बनकर पिछाडीवर...
- डहाणू विधानसभा मतमोजणी ठिकाणी मीडिया कक्षात सुविधांचा अभाव इंटरनेट टीव्ही सर्व काही बंद
- कुलाब्यातून पोस्टल मतदानात राहुल नार्वेकर आघाडीवर
- अहिल्यानगर नगर शहर मतदारसंघात संग्राम जगताप (AP) आघाडीवर
- नाशिक-सिन्नर:- माणिकराव कोकाटे आघाडीवर
- मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगलप्रभात लोढा आघाडीवर
- खामगाव मतदार संघात पोस्टल मतदानात भाजपाचे आकाश फुंडकर आघाडीवर
- अकोला पुर्वमधून भाजपचे रणधीर सावरकर पोस्टल मतांत आघाडीवर
- नालासोपारा पोस्टल मतमोजणीत विधमान आ क्षितिज ठाकूर यांना आघाडी
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE Updates: अकोट मतदारसंघातून भाजपचे प्रकाश भारसाकळे पोस्टल मतांत आघाडीवर आहे. पोस्टल मतदानाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं बाजी मारलेली आहे. तर, महाविकास आघाडीकडून काँटे की टक्कर दिली जात आहे.
Election Results 2024 Maharashtra LIVE Updates: ठाण्याच्या कोपरी पाचपाखडी येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत. केदार दीघे पोस्टल मतदानामध्ये पिछाडीवर आहेत.
Pune Election Results 2024: पोस्टल मतदानाला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं बाजी मारली आहे. आंबेगावातून दिलीप वळसे पाटील यांनी सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतली आहे.
Baramati Election Results 2024 LIVE : बारामतीचा धक्कादायक पहिला कल. सुरुवातीच्या कलांमध्ये युगेंद्र पवारांची बाजी, तर अजितदादा पिछाडीवर आहेत.
Election Results 2024 Maharashtra: महाराष्ट्राची धाकधूक वाढली असून पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला कल भाजपच्या बाजूनं लागला आहे, तर दुसरा कल काँग्रेसच्या बाजूनं लागला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE Updates : मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. समाजवादी पक्षाचे नेते विद्यमान आमदार अबू असीम आझमी याxची लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि शिवसेना शिंदे गटाचे बुलेट पाटील यांच्यात होत आहे. मतमोजणी 22 फेऱ्यात होणार असून 14 EVM टेबल मतमोजणी असून दोन टेबल टपाली मतदानासाठी असे एकूण 16 टेबल आहेत. यावेळी या मतदारसंघात 52% मतदान झालं आहे. एक लाख 74 हजार इतकं मतदान झालं आहे. गेल्यावेळी याच मतदारसंघात 47% मतदान झालं होतं, अतिशय संवेदनशील म्हणून हा मतदारसंघ आहे पोलिसांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटील विरुद्ध शरद पवारांचे देवदत्त निकम अशी बिग फाईट आंबेगावमध्ये होत आहे. शरद पवारांनी मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटल्यानंतर या विधानसभेकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून आहे. याचाच निकाल पुढच्या काही वेळात समोर येणार आहे.
Election Results Maharashtra 2024 LIVE Updates: काही मिनिटांत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पहिला कल हाती येणार आहे. पहिला कल 'ABP माझा'वर पाहु शकता. पुढच्या काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून टपाली मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीचा पहिला कल 'माझा'वर पाहू शकाल. टपाली मतमोजणीनंतर ईव्हीएम मतमोजणी सुरू होणार आहे. अचूक आणि वेगवान निकाल तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता.
Jalna Vidhan Sabha Election 2024 LIVE Updates: जालना जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघात दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांचा राजकीय फैसला आज होणार आहे.
जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाचा आज फैसला होणार असून, दिघजण राजकीय भवितव्य आज मतपेटीतून स्पष्ट होणार आहे.
जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर तर भोकरदन विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आणि घनसावंगी विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांचे भवितव्य पणाला लागले आहे.
जालना जिल्ह्यात पाचवी विधानसभा मतदारसंघात सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होत असून , पाचवी विधानसभा क्षेत्रात 14 टेबल वरती जवळपास 24 ते 27 मतमोजणीच्या फेऱ्या होणार असून दुपारी दोन पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.
Sewri Madarsangh Nivadnuk Nikal 2024 LIVE : मुंबईच्या शिवडी विधानसभा मतदारसंघाची (Sewri Madarsangh) मतमोजणी लोअर परळ (Lower Parel) भागात असलेल्या एन. एम. जोशी स्कूलमध्ये होणार आहे. इथे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय चौधरी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर आहेत. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून बारकाईनं तपासणी केली जात असून, ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या ठिकाणी त्यांना मोबाईल फोन आणण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
Maharashtra Mumbai Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: मुंबईमधील (Mumbai Matamojani LIVE) ज्या काही विधानसभा आहेत त्यातील मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा निकालावर सर्वांचे लक्ष आहे. इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक विरुद्ध सपा नेते अबू आझमी यांच्यात लढत आहे.तर शिवसेनेने ही याठिकाणी सुरेश उर्फ बुलेट पाटील यांना उमेदवारी दिली आहे. संवेदनशील असलेल्या या मतदार संघात सकाळ पासून चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
Solapur Vidhan Sabha Election LIVE : सोलापूर विधानसभा मतमोजणी : सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदार संघात आज मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात विधानसभा निहाय मतमोजणीसाठी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 7 पासून उमेदवार प्रतिनिधी, मतमोजणीतील शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना केंद्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघात 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. अक्कलकोट विधानसभासाठी सर्वाधिक 29 तर उत्तर सोलापूरसाठी सर्वात कमी 21 फेऱ्या होणार आहेत. सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, बार्शी, सांगोला, माढा या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE : विधानसभा निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कळमनुरी आणि वसमत या तीन विधानसभांचीसुद्धा मतमोजणी होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील या तीन विधानसभेसाठी एकूण 53 उमेदवार मैदानात असून साधारणतः दुपारी दोन वाजेपर्यंत या निवडणुकीचे कल हाती येणार आहेत. या निवडणुकीमध्ये कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीनं संतोष टारफे यांना उमेदवारी दिलेली आहे. कळमनुरी विधानसभेची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय कळमनुरी या ठिकाणी होत असून त्या ठिकाणचा आढावा घेतला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024: Nagpur Central Counting LIVE : नागपूर मध्य मतमोजणी : मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्यानंतर मध्य नागपूर विधानसभेच्या मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींशिवाय कोणालाही आत सोडण्यास परवानगी नाही.
Mumbadevi Matadarsangh Result 2024 LIVE Updates : मुंबादेवी विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होणार आहे. 7 वाजता अधिकाऱ्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाईल. 7 वाजून 30 मिनिटांनी स्ट्राँग रूम उघडल्या जातील आणि 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या शायना एनसी यांच्या पुढे काँग्रेस आमदार अमिन पटेल यांचं तगड आव्हान असणार आहे. या विधानसभा मतदारसंघात दुहेरी लढत होतं असून अमिन पटेल यांचं पारड जड राहू शकतं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या मुंबादेवी विधानसभेच्या मतमोजणी केंद्रावर अधिकाऱ्यांना आत घेतलं असून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Nashik Assembly Election Result 2024: नाशिक (Nashik Matadarsangh) शहरातील मतमोजणी केंद्रांच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक मध्य, पूर्व आणि पश्चिम या तिन्ही मतदारसंघात काँटे की टक्कर असल्यानं या मतदारसंघात निवडणुकीपूर्वी उमेदवारांमध्ये झालेले राडे या या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे, तर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Maharashtra Nivadnuk Nikal LIVE : कोल्हापुरतील (Kolhapur Matadarnagh) कागलच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशी लढत रंगली होती. आज निकाल स्पष्ट होणार आहे. कागलमध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ असा सामना रंगणार आहे. निवडणुकीत कागलमध्ये हायहोलटेज ड्रामा जाला होता. आता निकाल काय येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra Nagpur Assembly Election Result 2024 LIVE : निकालाचे चित्र स्पष्ठ झाल्याशिवाय कोणीही जल्लोष करु नका, अशा स्पष्ट सूचना भाजप पक्ष श्रेष्ठींनी दिल्या आहेत. हॉर्डिंगबाजी पण न करण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.
निकालाचे चित्र स्पष्ठ झाल्याशिवाय कोणीही जल्लोष करणार नसल्याच्या सूचना भाजप पक्ष श्रेष्ठींनी दिल्या आहेत. भावी मुख्यमंत्री, भावी मंत्री म्हणून पण होर्डिंगबाजी न करण्याच्या सूचना भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती मिळत आहे. भाजप सहा महायुतीतील घटकपक्षाच्या कार्यकर्त्याना सूचना दिल्या आहेत. हरियाणाच्या निकालाच्या दिवशी काँग्रेसवर आलेल्या नामुष्कीनंतर भाजपचा सावध पवित्रा घेतला आहे.
Maharashtra Nagpur Assembly Election Result 2024 LIVE : निकालाचे चित्र स्पष्ठ झाल्याशिवाय कोणीही जल्लोष करु नका, अशा स्पष्ट सूचना भाजप पक्ष श्रेष्ठींनी दिल्या आहेत. हॉर्डिंगबाजी पण न करण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.
निकालाचे चित्र स्पष्ठ झाल्याशिवाय कोणीही जल्लोष करणार नसल्याच्या सूचना भाजप पक्ष श्रेष्ठींनी दिल्या आहेत. भावी मुख्यमंत्री, भावी मंत्री म्हणून पण होर्डिंगबाजी न करण्याच्या सूचना भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती मिळत आहे. भाजप सहा महायुतीतील घटकपक्षाच्या कार्यकर्त्याना सूचना दिल्या आहेत. हरियाणाच्या निकालाच्या दिवशी काँग्रेसवर आलेल्या नामुष्कीनंतर भाजपचा सावध पवित्रा घेतला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 LIVE Updates: बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी आज पार पडणार आहे. साधारणता सकाळी आठ वाजता सुरुवातीला पोस्टल मदत मोजणी होणार आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन मतमोजणी सुरू होणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर 14 टेबल असून साधारणतः 22 ते 25 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आज सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतमोजणी केंद्रावर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये राज्यात 92 लाख मतदान वाढला, 92 लाखापैकी 53 लाख वाढलेला मतदान महिलांचा, महिलाच महाराष्ट्रातील सत्तेची दिशा निर्धारित करणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानाची आकडेवारी 2024
- एकूण मतदार 9 कोटी 70 लाख त्यापैकी झालेले मतदान 6 कोटी 40 लाख म्हणजेच 66.05%
- त्यामध्ये पुरुष मतदान 3 कोटी 34 लाख म्हणजेच 66.8 %
- तर महिला मतदान 3 कोटी 06 लाख म्हणजेच 65.21% राहिले आहे..
- याची 2019 सोबत तुलना केल्यास जाणवते की मतदानात भरीव वाढ झाली आहे.
- 2019 मध्ये एकूण मतदान 5 कोटी 48 लाख म्हणजेच 61.10% झाले होते.
- त्यापैकी पुरुष मतदान 2 कोटी 94 लाख म्हणजेच 62.7%
- तर महिला मतदान 2 कोटी 53 लाख 59.2%
- 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये तब्बल 92 लाख मतदान वाढले आहे.
- या वाढलेल्या मतदानात महिला मतदारांचा वाटा मोठा आहे. वाढलेल्या 92 लाख मतदानामध्ये 53 लाख मतदान महिलांचा आहे.
Bachchu Kadu: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडू यांना कोर्टाचा दिलासा, मंत्रालय अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ प्रकरणातून निर्दोश सुटका, बच्चू कडू यांच्याविरोधातील खटला मुंबई सत्र न्यायालयाकडून निकाली, सनदी अधिकारी प्रदीप बी. मंत्रालयात, महाराष्ट्र मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते, 29 सप्टेंबर 2018 रोजी मंत्रालय अॅनेक्स बिल्डींगच्या सातव्या मजल्यावरील कार्यालयात सायंकाळी पाचच्या सुमारास घटना घडली होती.
'महापरिक्षा' वेबपोर्टलमधील काही त्रुटींबाबत जाब विचारण्यासाठी बच्चू कडू व त्यांच्या प्रहार संघटनेचे लोक आले होते. 'महापरिक्षा' महाराष्ट्र आयटी कार्पोरेशनकडून घेतली जाते. कॉर्पोरेशनकडून माहिती मिळाली की लगेच देतो, असं उत्तर देताच बच्चू कडू संतापले होते. आणि त्यांनी टेबलावरील आयपॅड उचलून उगारत अधिकार-याला शिवीगाळ आणि अपमान करण्यास सुरुवात केली.
"सरकारी नोकर आहात, तसेच सांभाळून वाग... तुझी सॅलरी तुझा बाप देत नाही. दोन दिवसांत उत्तर द्या, नाहीतर तुम्हाला बघून घेईन", अशी धमकीही बच्चू कडूंनी दिली. याप्रकरणी 27 सप्टेंबरला मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याआधारे पोलीसांनी एफआयआर दाखल करुन घेत तपास पूर्ण करत बच्चू कडूंविरोधात खटला वर्ग केला होता.
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्याच्या भविष्याचा निकाल आज आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती जाणार? राज्याचा गाडा कोण हाकणार? याचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळाली होती. अशातच आजच्या निवडणूक निकालांमध्ये कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सर्वात जलद, अचूक आणि अविश्वसनीय निकाल फक्त आणि फक्त 'ABP माझा'वर...
युट्यूब लाईव्ह : https://www.youtube.com/watch?v=m0MD6Ukm0cQ
ABP Majha ट्वीटर : https://x.com/abpmajhatv
ABP Majha फेसबुक : https://www.facebook.com/abpmajha
Maharashtra Assembly Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून जिल्हा मुख्यालयात मतमोजणी सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, नसीम खान, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकी या नेत्यांचं भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (आज) सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. सत्ताधारी भाजप प्रणित महायुती आणि सत्तेत परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडी (MVA) यांच्यातील लढतीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पार्श्वभूमी
अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील रेसिनो ड्रग्स कंपनीत आज संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटानंतर आग लागली असून अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंबरनाथ उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -