Sunil Kedar : विधानसभा निवडुकीसाठी अनेक मतदारसंघात बंडखोरी केल्याचं चित्र आहे. अशातच रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना बंडखोरी करून निवडणुकीला उभे करण्याच्या निर्णयावर माजी आमदार सुनील केदार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांनी पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, आणि ते एकनाथ शिंदेंसोबत गेले. उध्दव ठाकरे यांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच काँग्रेसने बंडखोरी करत उमेदवार दिल्याचा दावा केदार यांनी केला आहे.
काय म्हणालेत सुनील केदार?
राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीबाबत बोलताना सुनील केदार म्हणाले, उद्धवजी ज्यांनी तुमच्या सोबत गद्दारी केली. त्या आमदाराला धडा शिकवण्यासाठी आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला, अशा शब्दात काँग्रेस नेते सुनील केदार यांनी रामटेक मधील बंडखोरी संदर्भात खुलासा केला आहे. रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांना सत्तेचा माज आला आहे. मीच सरकार पाडलं असा दम ते भरत होते. मुळात आशिष जयस्वाल यांना प्रशासनाचा काहीच कळत नाही, कायद्याचं काही कळत नाही तरी ते वकिलासारखी भाषा बोलतात असेही केदार पुढे म्हणालेत. रामटेकमध्ये बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय करताना आम्हालाही त्रास झालं. मात्र सर्वांचा हित लक्षात घेऊन मी आणि रामटेकचे खासदार श्याम बर्वे यांनी असा निर्णय घेतला असेही सुनील केदार म्हणाले आहेत.
रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे विशाल बरबटे आहे. मात्र, त्यांच्या विरोधात काँग्रेस जिल्हा अध्यक्ष व सुनील केदार यांचे खास विश्वासू राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे आणि महाविकास आघाडी समोर तगड आव्हान उभा केलं आहे.त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अविश्वासाची दरी निर्माण झाली आहे. तेच पाहता रामटेक मध्ये झालेल्या प्रचार सभेत सुनील केदार यांनी बंडखोरी संदर्भात खुलासा केला आहे.
आमदार आशिष जयस्वाल काय म्हणालेत?
सुनील केदार यांच्या दिलेल्या उत्तरावर बोलताना आमदार आशिष जयस्वाल म्हणाले, जो व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतात. आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणू आणि स्वतः ते उद्धवजींकडे वारंवार गेले पण उद्धवजींनी त्यांना नाकारलं, त्यांना खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्णपणे संपुष्टात आणायची होती आणि म्हणून आम्ही जेव्हा ठाकरेंसोबत होतो. तेव्हा अशाच प्रकारची वागणूक आम्हालाही देत होते. ते आमच्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊन त्यात आमचा अवमान करत होते, म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि आता जेव्हा त्यांनी अशी उद्धव ठाकरेंची फसवणूक केली त्यानंतर भास्कर जाधव यांनी त्यांना पूर्णपणे एक्सपोज केलं.
भास्कर जाधव यांनी त्यांना असं एक्सपोज केलं की, पूर्ण मतदार संघात त्यांची प्रतिमा मलिन झाली. आपली अब्रू झाकण्यासाठी आणि आपली खराब झालेली प्रतिमा त्याला वाचवण्यासाठी केदार यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या व्हिडिओ फिरत आहेत की सुनील केदार यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला शब्द दिला होता. लोकसभेची जागा दिल्यानंतर जो शब्द दिला होता हा व्हिडिओ सर्वत्र फिरत आहे त्यामुळे गेलेली अब्रू वाचवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न सुनील केदार यांनी केला आहे. परंतु जनतेच्या लक्षात आलेला आहे. महाविकास आघाडी लोकसभेला हातात हात घेऊन होती पण आता ते एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
ते वारंवार उद्धव ठाकरे यांच्या दारात गेले पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाहेर काढलं तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला लोकसभेची जागा दिली. 25 मधून एक सीट तुम्ही आम्हाला दिली आणि दिलेली एक जागा देखील तुम्हाला आवडत नाही. काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाच्या त्या उमेदवाराला मदत करायला हवी होती. स्वतःच्या माणसाला काँग्रेसने लाथ मारून हाकलेला आहे. काँग्रेस मधून निष्कषित केलेलं आहे त्यांचा प्रचार सुनील केदार करत आहेत, असेही असे जयस्वाल यांनी म्हटलेला आहे आशिष जयस्वाल हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत.