सांगली- महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकारण चांगलच तापलं. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली. शरद पवार यांच्यावरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत यांनी एबीपी माझाशी बोलताना खुलासा केला आहे. मला कुणाच्याही आजारावर बोलायचं नव्हतं, मला गेल्या 50 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक चेहऱ्यावरती बोलायचं होतं. कुणालाही काय आजार झाला आहे, यावरही मला काही बोलायचं नव्हतं. काही लोकांना काही झालं की, त्या गोष्टी राजकीय फायदा घेण्यासाठी आपल्यावर ओढवून घ्यायची सवय आहे असंही यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.


नेमकं काय म्हणालेत सदाभाऊ खोत?


सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर दिलगिरी व्यक्त केली असली तरी ते अद्याप त्यांच्या काही मतांवरती ठाम आहेत. सदाभाऊ खोत यांना नेमकं काय म्हणायचं होतं ते त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितला आहे. सदाभाऊ खोत यावेळी बोलताना म्हणाले, मला कोणाच्याही आजारपणावरती किंवा व्यंगत्वावरती बोलायचं नव्हतं. कारण मी जे काही भाष्य केलेलं होतं त्याबद्दल जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर तर निश्चितपणानं ते शब्द मी मागे घेत आहे. ते घेतलेही आहेत. त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मला बोलायचं होतं राजकीय आणि सामाजिक चेहऱ्यावरती आणि म्हणूनच निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये जे गेल्या पन्नास वर्षांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे आणि गाव गड्यांची जी हरपळ झाली त्याच्याबरोबर विस्थापितांच्या बरोबर आम्ही गेली 40 वर्षे लढत आहोत. लाट्या काट्या खात आहोत अनेकांनी प्राण्यांच्या होती दिली आणि ही आहुती दिलेला लढा हा गावगड्यासाठी होता. त्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं ज्यांनी ज्यांनी खळं लुटलं त्याच्या विरोधात आमचा आवाज बुलंद असेल. 


काही लोकांना संबंध नसताना आपल्यावरती ओढवून घ्यायची सवय असते. त्याच्यातून आपल्याला काही लाभ राजकीय लाभ मिळू शकेल का लोकांच्यामध्ये नकारात्मक काही पाठवता येईल लोकांच्या भावनेला कसा हात घालता येईल अशा पद्धतीचं एक कटकारस्थान या राज्यामध्ये महाविकास आघाडीने लोकसभेला खेळलं होतं आताही खेळायला जात आहे. 


मी कोणाच्या आजारपणावर किंवा व्यंगत्वावर भाष्य केलेलं नव्हतं. मी स्पष्टपणे म्हटलं राजकीय आणि सामाजिक चेहऱ्यावरती मला भाष्य करायचं होतं. गाव गाड्यांमध्ये काही शब्द असतात आभाळाकडे बघून... तो पुढचा शब्द मी वापरणार नाही जाऊन आरशात तोंड बघ जा मग काय झालं असतं असं म्हणलं असतं. तर म्हणाले असते सदाभाऊ व्यक्तिगत पातळीवर आले आहेत, असं काही नाही म्हणून मला वाटतं यांनी गावगाडा लुटला आहे आणि आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या अनुषंगाने ते तो पुन्हा एकदा आपल्या हातात आला पाहिजे म्हणून त्यांचा हा शेवटचा चाललेला खटाटोप आहे. पण इथला गाव गाडा हे ओळखून आहे असे पुढे सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे. 


जयंत पाटलांवर केलेल्या टीकेवर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, त्यांनी आधी माझ्यावर टीका टिप्पणी केलेली आहे. पोस्ट टाकलेली आहे. आभाळावर पोस्ट टाका. काही हरकत नाही, जयंत पाटलांना मी हेच सांगेन,  ज्यावेळी मला तुमच्या गुंडाने अंग सुजेपर्यंत मारलं, तेव्हा त्यावेळी तुम्हाला हृदय होतं की नाही. तुम्ही पक्ष चालत होता की गुंडांची टोळी चालवता. गरीब माणसांना मारलं तर गरीब माणसाने बोलायचं नाही का म्हणजे हे राज्य गुंडांचा राज्य बनवायचा आहे का, मग आता तुम्हाला वाईट का वाटत आहे. गरीब घरातली मुलं आता सत्तेत यायला लागली, मंत्री व्हायला लागली. सातबारा वरती यांचंही नाव यायला लागलं याची भीती त्यांना जास्त वाटायला लागली आहे का, पुढे त्यांनी काही माझ्यावरती भाष्य केलं तर मी ूमाझ्या पद्धतीने त्यांना बोले मला काही मुख्यमंत्री पदाचा स्वप्न पडत नाही, असे सदाभाऊ खोत यांनी पुढे म्हटले आहे.