Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊतला गावगाडा माहिती नाही, त्यामुळे राखण करणारा कुत्रा म्हणजे काही माहित नाही. पण तुम्ही 2014 आणि 2019 ला नरेंद्र मोदी यांचा फोटो गळ्यात अडकवून मतांचा जोगवा मागत गावोगावी फिरत होता, असा पलटवार आमदार सदाभाऊ खोत यांनी (Sadabhau Khot on Sanjay Raut) केला आहे. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर केलेल्या टीकेवर सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सदाभाऊ खोत यांना अत्यंत कडक शब्दात फटकारले आहे. चौफेर टीकेनंतर सदाभाऊ खोत यांनी नरमाईचे धोरण स्वीकारत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, संजय राऊत यांनी थोबाडीत द्यायला हवी होती, अशी टीका करताच सदाभाऊंनी आता संजय राऊत यांची तुलना डुकराशी केली आहे. 


डुक्कराला कितीही साबण शाम्पू लावला तरी डुक्कर गटारातच जातं


सदाभाऊ यांनी म्हटलं आहे की, 2019 मध्येही तुम्ही भाषण करत होता. सत्तेत आल्यावर तुम्ही पहिला खंजीर हातात घेतला. तुमच्यात इमानदारपणा आहे का शोधा आणि कुत्र्याएवढा जरी इमानदारपणा असता तर महाराष्ट्रान तुमचं कौतुक केलं असतं. तरीही मला त्याच्यावर जास्त काही बोलायचं नाही कारण डुकराला कितीही साबण शांपू लावला तरी डुक्कर गटारातच जातं, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावर केली.


काय म्हणाले, संजय राऊत?


संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेनंतर सडकून टीका केली. ते म्हणाले की, यांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय? टीका करायला लोकशाहीत हरकत नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो तो यासाठीच करतो. फडणवीस महाराष्ट्राचे शत्रू आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे राज्य सुसंस्कृत, संयमी आहे. हे संतांचे राज्य आहे. हे चांगल्या राजकारण्यांचं राज्य आहे. फडणवीस आणि त्यांच्या टोळीने हे राज्य संपवले आहे. म्हणून आम्हाला या राज्यातील सत्ता बदलायची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती, पण ते फिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते, तुम्ही कधीतरी या राज्याचे मुख्यमंत्री होता आणि आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होतात, असा हल्लबोल संजय राऊत यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या