Tanaji Sawant : सरकारनं सर्व घटकासाठी योजना राबवल्या आहेत. त्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या असून, महायुती एकसंघ आहे. त्यामुळे येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात महायुतीच विजयाचा गुलाल उधळेल असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी व्यक्त केला आहे. भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातून 1 लाख टक्क विजयाची खात्री मला असल्याचे सावंत म्हणाले. आजचा मुहूर्त साधत डॉक्टर तानाजी सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी ते बोलत होते.
धाराशिव कळंब विधानसभेच्या जागेचा तिढा आज सुटेल
आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मुहूर्त साधत भूम परंडा वाशी विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते. 28 नोव्हेंबरला डॉ. सावंत यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज पुन्हा दाखल करणार आहेत. सरकारने सर्व घटकासाठी योजना राबवल्या व त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. महायुती एकसंघ आहे. त्यामुळे येत्या 23 नोव्हेंबरला महायुती राज्यात विजयाचा गुलाल उधळेल असा विश्वास आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच धाराशिव कळंब विधानसभेच्या जागेचा तिढा आज सुटेल अशी माहिती सावंत यांनी दिली. सावंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तानाजी सावंतांच्या विरोधात ठाकरे गटाकडून रणजित पाटील मैदानात
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून (Shiv Sena Uddhav Thackeray Group) काल 65 नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. परांडा विधानसभा मतदारसंघातून (Paranda Assembly Election) ठाकरे गटानं निष्ठावंत शिवसैनिकाच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलगा रणजित पाटील (Ranjit Patil) यांना उमेदवारी दिली आहे. पण उमेदवारी यादी प्रसिद्ध करताना चुकून राहुल पाटील असे नाव देण्यात आले आहे. मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याविरोधात ते मैदानात उतरवले आहेत. परांडा विधानसभा मतदारसंघातील आमदार तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. गेल्या वेळेस त्यांच्या विरोधात राहुल मोटे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राहुल मोटे हे इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटला आहे. तीन टर्म आमदार राहिलेल्या राहुल मोटेंचा पत्ता यावेळेस कट झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड