Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राच्या निवडणुकीला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. मात्र महाविकास आघाडीत जागावाटपाचा प्रश्न अजूनही कायम आहे. एकीकडे महायुतीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) आणि शिवसेना (यूबीटी) या तीन बड्या पक्षांनी 85-85 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली असताना, दुसरीकडे अन्य पक्षांच्या दाव्यांबाबतही खडाजंगी सुरू आहे. समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीला एक दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. सपाने 5 जागांची मागणी केली आहे. तसे न झाल्यास  25 जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


मी 25 उमेदवारांची घोषणा करेन


सपाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी शुक्रवारी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 5 जागांची मागणी केली असून उत्तरासाठी शनिवारची मुदत दिली आहे. या बैठकीची माहिती देताना आझमी म्हणाले की, मी 5 जागा मागितल्या आहेत. यामध्ये दोन विद्यमान जागांचा (भिवंडी पूर्व आणि मानखुर्द) समावेश आहे. अबू आझमी म्हणाले की, आम्ही 5 उमेदवार घोषित केले आहे ते जिंकून येणार आहेत. मी वाट बघू शकत नाही जे लोक सरकार आणायची चर्चा करत आहे ते अद्याप तिकीट वाटप सुरु करू शकलेलं नाही. मी याच मुद्द्यावर त्यांच्याशी बोललो. दुसऱ्या पक्षात एवढा मोठा उमेदवार नाही. मला या आधी काँग्रेसने दोनवेळा धोका दिला आहे. जर मला बोलले नाही तर मी 25 उमेदवार तयार केले आहेत मला 5 जागा घोषित आणि आणखी दोन जागा द्यायला हव्यात तर मी थांबेल. मी मुंबईत तीन जागा मागत असून अणुशक्ती नगर मागत आहे. भायखळा, वर्सोवा मी मागत आहे. दुर्देव आहे की मविआकडे अल्पसंख्याक उमेदवार नाही. 


ते म्हणाले की, भिवंडी पश्चिम, मालेगाव आणि धुळे शहरासाठी आणखी तीन जागांची मागणी करण्यात आली आहे. मी उद्या (शनिवारी) दुपारपर्यंत वाट पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मी माझा निर्णय घेईन. मी 25 उमेदवारांची घोषणा करेन. अखिलेश यादव यांनी मला सांगितले आहे की, महाराष्ट्रात मीच निर्णय घेतो. नवाब मलिक यांची इच्छा असेल तर ते माझ्याविरोधात मानखुर्द-शिवाजी नगरमध्ये निवडणूक लढवू शकतात. जर तुम्ही अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व दिले नाही तर ते निवडणूक लढवतील आणि तुमच्याकडे दुसरे हरियाणा असेल.


याआधी, महाराष्ट्र निवडणुकीवर समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव म्हणाले होते की, राज्यात भाजपचा पराभव होणार आहे, भाजपची युती हरणार आहे, दारुण पराभव होणार आहे. बुधवारी महाविकास आघाडी (MVA) च्या पत्रकार परिषदेत तीन मोठ्या पक्षांमध्ये 85-85 जागा वाटपाची घोषणा करण्यात आली. मात्र, अंतिम करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अद्याप चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात आले. एकूण 288 पैकी उरलेल्या 33 जागा आपापसात आणि छोट्या पक्षांमध्ये वाटून घेण्याबाबत तिन्ही मित्रपक्ष चर्चा करत आहेत. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत म्हणाले होते की, 288 जागांपैकी 270 जागांवर एकमत झाले आहे. राऊत म्हणाले होते, "आम्ही समाजवादी पार्टी, शेकाप, माकप, सीपीआय आणि आप यांचा समावेश करू. उर्वरित जागांसाठी अजूनही चर्चा सुरू आहे. आम्ही 270 जागांवर सौहार्दपूर्णपणे एकमत केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या