Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election) 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हाती येणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात एका अपक्ष उमेदवाराचे त्याच्या पती, बहीण आणि मेव्हण्यासह अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. छत्रपती संभाजीनगर येथील अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचं अपहरण करण्यात आलं आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान, औरंगाबाद पूर्व मधून राजू शिंदे नावाच्या अपक्ष उमेदवाराचं अपहरण झाल्याची तक्रार संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मात्र राजू शिंदे यांनीच आपलं कुठलंही अपहरण झालं नसून आपण संभाजीनगरला आपला अर्ज मागे घेण्यासाठी जात असल्याचे म्हटला आहे. त्यामुळे कोणीही अफवा पसरू नये असं आवाहन अपक्ष उमेदवार अर्ज भरलेले राजू शिंदे यांनी म्हटलं आहे...
शिर्डीहून नाशिककडे जाताना अपहरण झाल्याची तक्रार
अधिकची माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचं अपहरण करण्यात आलं आहे. याशिवाय धक्कादायक बाब म्हणजे अपक्ष उमेदवाराच्या पत्नी, बहीण आणि मेव्हण्याचेही अपहरण करण्यात आले आहे. शिर्डीहून नाशिककडे जाताना अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आलाय.
उध्दव ठाकरे गट व अपक्ष उमेदवार यांच्या नावात साधर्म्य
याप्रकरणात झिरो नंबरने गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात होणार वर्ग आहे. उमेदवार राजू शिंदे यांचे सहकारी मंगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उध्दव ठाकरे गट व अपक्ष उमेदवार यांच्या नावात साधर्म्य असल्यानेही छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. संगमनेर शहराजवळील समनापूर गावाजवळ घटना घडल्याची प्रथिमक माहिती आहे.
अपक्ष उमेदवाराचे पत्नी, बहीण मेव्हण्यासह अपहरण ..
छत्रपती संभाजीनगर येथील अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचं अपहरण...
शिर्डीहुन नाशिक कडे जाताना अपहरण झाल्याची तक्रार...
संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..
झिरो नंबर ने गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात होणार वर्ग...
उमेदवार राजू शिंदे यांचे सहकारी मंगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल...
उध्दव ठाकरे गट व अपक्ष उमेदवार यांच्यात नावात साधर्म्य
संगमनेर शहराजवळील समनापुर गावाजवळ घटना घडल्याची प्रथिमक माहिती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदेंच्या जवळचा माणूस ईडीने ताब्यात घेऊन शिवसेना फोडली; ठाकरेंच्या खासदाराने तोफ डागली