Maharashtra Loksabha Election 2024 : राज्यात दोन मोठे राजकीय पक्ष फुटल्यानंतर प्रथमच होत असलेल्या सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार आघाडी घेतली असून जवळपास 27 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे सांगलीमधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील सुद्धा निर्णायक मतांनी आघाडीवर आहेत. महायुतीची राज्यामध्ये पिछेहाट झाली आहे. 

सुरुवातीच्या कलानुसार 11 वाजेपर्यंत भाजप राज्यामध्ये 12 जागांवरती आघाडीवर आहे. शिंदे गट सात जागांवर आघाडीवर आहे. अजित पवार गट अवघ्या एक जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गट सात जागांवर आघाडीवर आहे. शरद पवार गट दहा जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 10 जागांवरती आघाडीवर आहे. त्यामुळे एकंदरीत महाविकास आघाडीने 27 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. 

दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा बोलबाला असून 10 पैकी तब्बल 8 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे. विदर्भामध्ये सुद्धा महायुतीची पिछेहाट झाली आहे. 

मावळ लोकसभा अपडेट 

मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीरंग बारणे 21397 मतांनी आघाडीवर..  ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पिछाडीवरश्रीरंग बारणे (शिंदे गट) : 133614संजोग वाघेरे (ठाकरे गट) : 112217

सांगली

सातव्या फेरी अखेर विशाल पाटील यांना 28 हजारांचे मताधिक्य. सातव्या फेरी अखेर विशाल पाटील यांच्या मताधिक्यात दोन हजाराने घट

पुणे 

26 हजार 772 मतांनी चौथ्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ आघाडीवर

माढा लोकसभा 

4 फेरी नंतर मोहिते पाटील 11, 770 मतांनी आघाडी, तर भाजप विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर 

इतर महत्वाच्या बातम्या