Kolhapur Loksabha Result Nikal Live Update : अत्यंत चुरशीने होत असलेल्या कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम आहे शाहू महाराज 8 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील अवघ्या 66 मतांनी आघाडीवर आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूरच्या तुलनेत अत्यंत चुरशीने लढत सुरू आहे.






पहिल्या फेरीत 8000 इतक्या मतांनी शाहू महाराज छत्रपती आघाडीवर 


कोल्हापूर उत्तर, राधानगरी या विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत मताधिक्य 


⏩ चंदगडमधून पहिल्या फेरीत एका मताची आघाडी 


⏩ कागलमधून 848 मतांची  खासदार मंडलिक यांना आघाडी 


इतर महत्वाच्या बातम्या