Congress Candidate list Maharashtra मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आता सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारी (MVA Candidates list) यादीची उत्सुकता लागली होती. आता काँग्रेसने त्यामध्ये बाजी मारली आहे. काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमेदवारी यादीमध्ये 48 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. तसेच, या यादीतून पुन्हा घराणेशाही दिसून आली आहे,
48 उमेदवारांची पहिली यादी
1. अक्कलकुवा - ॲड. के.सी. पडवी (ST)2.शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी (ST)4.नवापूर - श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)5.साक्री - एसटी प्रवीणबापू चौरे6.धुळे ग्रामीण - कुणाल रोहिदास पाटील7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे10.रिसोड - अमित सुभाषराव झनक11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख13.तेओसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर14.अचलपूर - अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख15.देवळी - रणजित प्रताप कांबळे16.नागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल्ल विनोदराव गुडधे17.नागपूर मध्यवर्ती - बंटी बाबा शेळके18.नागपूर पश्चिम - विकास पी. ठाकरे19.नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत20 साकोली - नानाभाऊ फाल्गुनराव पटोले21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे23.ब्रह्मपुरी - विजय नामदेवराव वडेट्टीवार24.चिमूर - सतीश मनोहरराव वारजूकर25.हदगाव - माधवराव निवृत्तीराव पवार पाटील26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर27 नायगाव - मीनल निरंजन पाटील (खतगावकर)28 पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर29 फुलंब्री - विलास केशवराव औताडे30 मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसेन31 मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख32 चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान33 धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)34 मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल35 पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप36 भोर - संग्राम अनंतराव थोपटे37 कसबा पेठ - रवींद्र हेमराज धंगेकर38 संगमनेर - विजय बाळासाहेब थोरात39 शिर्डी - प्रभावती जे.घोगरे40 लातूर - ग्रामीण धिरज विलासराव देशमुख41 लातूर शहर - अमित विलासराव देशमुख42 अक्कलकोट - सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे43 कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण44 कोल्हापूर दक्षिण - रुतुराज संजय पाटील45 करवीर - राहुल पांडुरंग पाटील46 हातकणंगले - राजू जयंतराव आवळे (SC) 47 पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम48 जाट - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत
दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 65 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.