परभणी : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) धूम चालू आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असून ते पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. दरम्यान, मराठवाड्यातील परभणी या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या जागेवरून कोण बाजी मारणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीने राहुल पाटील यांना तिकीट दिले आहे. राहुल पाटील (Rahul Patil) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाचे नेते आहेत. दरम्यान, या जागेवर 2019 साली नेमकं काय घडलं होतं? या मतदारसंघाची राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे? हे जाणून घेऊ या... 


काँग्रेसच्या नेत्याने केली होती बंडखोरी


परभणी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात नेहमीच शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळालेली आहे. 2019 साली परभणी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक पंचरंगी झाली होती. ज्यामध्ये शिवसेनेकडून डॉ. राहुल पाटील यांना तिकीट मिळाले होते. काँग्रेस पक्षाकडून रविराज देशमुख हे मैदानात होते. 2019 साली वंचित बहुजन आघाडी या पक्षाची चर्चा होती. त्यामुळे  वंचित बहुजन आघाडी कडून मोहम्मद गौस यांना उमेदवारी मिळाली होती. तर अपक्ष म्हणून काँग्रेसचे बंडखोर सुरेश नागरे यांनी निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे 2019 सालच्या निवडणुकीत एमआयएम पक्षानेही येथे आपला उमेदवार दिला होता. 2019 साली एमआयएमकडून अली खान यांनी निवडणूक लढवली होती. 


कोणाला किती मतं मिळाली होती?


2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील मिळाली होती. त्यांनी एकूण 104584 मते घेतली होती. जे जवळपास 81 हजार मतांच्या लीडने विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख यांचा दारुण पराभव झाला होता. त्यांना थेट 5 व्या क्रमांकावर जावे लागले होते. रविराज देशमुख यांना केवळ 15,580 मतं मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता.  मोहम्मद गौस यांना 22794 मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे अली खान होते. त्यांना 22741 मते मिळाही तो. तर  काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरे यांना 18,431 मत मिळाली होती.


यावेळच्या निवडणुकीत काय होणार? 


परभणी मतदारसंघाची यावेळची निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे. या मतदारसंघात मुस्लीम, दलित मतांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे हे मतदार कोणाच्या बाजूने उभे राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या जागेवर राहुल पाटील पुन्हा एकदा विजयी कामगिरी करणार? की महायुतीचा उमेदवार बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   


हेही वाचा :


Gangakhed Vidhan Sabha Elections Result : गंगाखेडमध्ये कोण मारणार बाजी, महायुती जिंकणार की मविआ ठरणार वरचढ?


Parbhani Assembly Election : परभणीत नेमकी कोणाची ताकद, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?


Pathri Vdhan Sabha Election 2024 : पाथरी विधानसभेतून कोण मारणार बाजी? महायुती ठरणार सरस की पुन्हा मविआ झेंडा फडकवणार?