Do Patti song: दो पत्ती या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. काजोल आणि कृती सेननची स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाच्या गाण्यावरून सध्या वाद सुरु आहे.  दो पत्ती या चित्रपटातील 'अखिंया दे कोल'  या गाण्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे स्टेप चोरल्याच्या आरोपावरून. या गाण्यात कृती सेनननं रेड ड्रेसमध्ये जबरदस्त डान्स केला आहे पण ऐश्वर्या रॉयच्या लोकप्रीय क्रेझी किया रे गाण्यातील स्टेप्स कॉपी केल्याचं म्हणत कृती सेनन सध्या चांगलीच ट्रोल झाली आहे. शिवाय एक क्लासीक गाणं खराब केल्याचा ठपकाही नेटीझन्सनं तिच्यावर केलाय.


काजोल आणि क्रृती सेननचा डबल रोल असणाऱ्या दो पत्ती या चित्रपटात ॲक्शन थ्रिलर ड्रामा दाखवण्यात आला आहे.


ऐश्वर्या रॉयच्या क्रेझी किया रे ची कॉपी!


अखियां दे कोल हे दो पत्ती या चित्रपटातील गाणं आता नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे.  ऐश्वर्या रॉय हिच्या क्रेझी किया रे या गाण्याच्या स्टेप्स चोरल्याचं म्हणत नेटकरी या गाण्यावर संतापले आहेत. कृतीने पाकिस्तानी गाणं आणि ऐश्वर्या रॉयच्या स्टेप्स दोन्ही चोरी केल्या आहेत. स्वत: काय केलं.. अशा प्रकारच्या कमेंटस या गाण्याला येत आहेत.


 






जुनं पाकिस्तानी गाणं चोरल्याचा होतोय आरोप


दो पत्ती या सिनेमातील अखियां दे कोल हे गाणं जुन्या क्लासिक गाण्याची चोरी असल्याचे नेटकरी म्हणतायत. पंजाबी फोक गाणं असून बॉलिवूड कायमच मास्टपीस गाण्यांना उध्वस्त करत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या गाण्यावर व्यक्त केल्या आहेत.






 


कृती होतेय जोरदार ट्रोल


कृती तिच्या डान्स मुव्ह्सवरही जोरदार ट्रोल होत आहे. कृतीला वाटतंय ती ऐश्वर्या आहे. पण तिचा कोणताही सिनेमा चालत नाही. अशाप्रकारच्या कमेंटस कृती सेननला येत आहेत. 25 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलिज होत आहे.