Maharashtra Vidhan Sabha Election : सातारा : सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या जयकुमार गोरे यांनी विजयाचा चौकार मारला आहे. जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रभाकर घार्गे यांचा पराभव केला आहे. जयकुमार गोरे यांनी या विजयासह माणमधून होत चौकार मारला आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील 19 व्या फेरीपर्यंतच्या आकडेवारीनुसार जयकुमार गोरे यांना 144720 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाकर घार्गे यांना 96355 इतकी मतं मिळाली आहेत.
जयकुमार गोरे यांचा चौकार
माण विधानसभा मतदारसंघात 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जयकुमार गोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपात ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला होता. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. 2014 ची विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्यानं काँग्रेसकडून जयकुमार गोरे आमदार झाले होते. 2014 ते 2019 ही टर्म संपण्यापूर्वीच जयकुमार गोरे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या चिन्हावर 2019 ची विधानसभा निवडणूक जयकुमार गोरे यांनी लढवली आणि ते विजयी झाले. जयकुमार गोरे 2024 ला भाजपच्या चिन्हावर दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
2024 ला दणदणीत विजय
माण विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीवेळी तिरंगी लढत झाली होती. भाजपकडून जयकुमार गोरे, शिवसेनेकडून शेखर गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाकर देशमुख उमेदवार होते. माण मतदारसंघातील या निवडणुकीत जयुकमार गोरे यांना 91469 मतं मिळाली. प्रभाकर देशमुख यांना 88426 मतं मिळाली. तर, शेखर गोरे यांना 37539 मतं मिळाली. जयकुमार गोरे यांना त्यावेळी तिरंगी लढतीचा फायदा झाला. यावेळी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे आणि प्रभाकर घार्गे यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत जयकुमार गोरे विजयी झाले. जयकुमार गोरे यांना 144720 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाकर घार्गे यांना 96355 इतकी मतं मिळाली आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत हा माण मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना आघाडी मिळाली होती.
इतर बातम्या :