मुंबई: मुंबई शहर आणि उपनगर तसेच पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणारा वेशीवरचा मतदारसंघ म्हणजे कुर्ला विधानसभा (Kurla Vidhan Sabha constituency)  मतदारसंघ. शिवसेनेचे विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) या मतदारसंघातून यंदा आपली विजयी हॅटट्रिक साधण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, शिवसेनेतील ऐतिहास फुटीनंतर मातोश्रीचा हात सोडून मंगेश कुडाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात पकडला. त्यामुळे यंदाची निवडणूक आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी तितकीशी सोप्पी नाही. असं असलं तरी दांडगा जनसंपर्क, गरजेच्यावेळी उपस्थिती आणि परिसरातील विकासकामं ही कुडाळकरांसाठी जमेची सर्वात मोठी बाब आहे. 


गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये मंगेश कुडाळकरांना इथं 41,580 मतं पडली होती. जी एकूण टक्केवारीच्या 44.60 टक्के होती. राष्ट्रवादीच्या मिलिंद कांबळे यांचा कुडळकरांनी 21013 मतांनी पराभव केला होता. टिळक टर्मिनसला खेटून असलेल्या डेअरीच्या जागेवर धारावी पुनर्वसनाच्या विरोधाचा मुद्दा हा यंदाच्या निवडणुकीत इथं सर्वात जास्त चर्चेचा आहे. या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गट दावा सांगणं अपेक्षित आहे. मात्र, कुडाळकरांच्या विरोधात इथं शिवसेनेच्या नव्या स्थानिक चेहऱ्याला संधी मिळणार की महाविकास आघाडीतील एखादा चेहरा देऊन सरप्राईज फॅक्टरचा पवार केला जाणार, हे पाहावं लागेल.


आणखी वाचा


धारावी विधानसभा मतदारसंघात कोणाचे पारडे वरचढ, महायुती की मविआ,कोण बाजी मारणार?


विधानसभेची खडाजंगी: महाडमध्ये भरत गोगावले हॅटट्रिक करणार?; महायुती की महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?


विधानसभेची खडाजंगी: श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा वरचष्मा; महाविकास आघाडीकडून कोण भिडणार?