सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज रात्री भेट होणार आहे. राज ठाकरे रात्री 11 ते 11:30 वाजे पर्यंत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन माहीम विधानसभा साठी चर्चा करणार आहेत. दुसरीकडे सदा सरवणकर उद्या माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर देखील सदा सरवणकर अर्ज भरण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अमित ठाकरे, राज ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं काम आहे, त्यांनी लोकसभेला उमेदवार दिले नव्हते, असं म्हटलं. 


अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं काम


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला एकही जागा न घेता महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आमचेही कर्तव्य आहे की, अमित ठाकरे यांना पाठिंबा देणे. मात्र, तिथे आमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याशी बोलणे सुरू आहे. त्यांचा योग्य तो मान राखून सन्मान दिला जाईल. या ठिकाणी तोडगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काढणार आहेत.  अमित ठाकरेंना पाठिंबा देणं काम आहे, राज ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं काम आहे. 


 मी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून आलेलो आहे. सदा सरवणकर यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.  पुढचे पाच वर्ष ते राज्यमंत्री राहणार आहेत.  सदा सरवणकर हे आमचे प्रमुख आमदार असून कठोर लढा देऊन त्यांनी हा मतदारसंघ टिकवून ठेवला आहे. ते आमच्या उत्कृष्ठ आमदारांपैकी एक आहेत.  ते पाचव्यांदा आमदार आहेत, त्यांचा योग्य तो मान ठेवला जाईल. हा आमच्या सर्वांचा आग्रह आहे. सदा सरवणकर यांनी सिद्धिविनायकसाठी 500 कोटी रुपये मंजूर करुन आणले आहेत, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.  


रामदास आठवले यांच्या नाराजीबद्दल विचारल असता दीपक केसरकर यांनी अजून जागावाटप होणार असून त्या वाटाघाटीत रामदास आठवले यांना जागा देऊ किंवा विधान परिषदेत जागा देण्यात येईल, असं म्हटलं.


दरम्यान,  माहीम विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकेडून महेश सावंत, शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि मनसेकडून अमित ठाकरे रिंगणात आहेत.  



इतर बातम्या : 


Gyayak Patni : दिलीप वळसेंच्या नातेवाईक असलेल्या सई डहाकेंना भाजपची कारंजातून उमेदवारी, शरद पवारांनी तरुण तूर्क मुलाला मैदानात उतरवलं