Murtijapur Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यातील एकमेव राखीव असलेला विधानसभेचा एकमेव  मतदारसंघ म्हणजे मुर्तीजापूर....मुर्तीजापूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महाराष्ट्र निर्मितीनंतर एक अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देणारा मतदारसंघ.... कधीकाळी काँग्रेसचा सूर्य या मतदारसंघातून मावळत नव्हता असे बोलले जायचे. मात्र, 1990 च्या दशकात प्रकाश आंबेडकरांच्या 'अकोला पॅटर्न' आणि भाजपचा या मतदारसंघाच्या राजकीय पटलावर उदय झाला. अन काँग्रेसही येथून हद्दपार झालीय. अन 1995 पासून 2004 चा अपवाद वगळता भाजपने या मतदारसंघावरील आपला प्रभाव कायम ठेवलाय. विशेष म्हणजे भाजपला भारिप-बहुजन महासंघ, काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीतील मतविभाजनाच्या जोरावरच येथे ताकद वाढवता आली आहे. 2009 पासून गेल्या तीन निवडणुकांत भाजपचे हरीश पिंपळे हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आता या निवडणुकीमध्ये भाजपचे हरीश पिंपळे पुन्हा एकदा 35864 मतांनी विजयी झाले आहेत.


मुर्तिजापूर (राखीव - अनुसूचित जाती) : 


एकूण मतदार : 311175
झालेले एकूण मतदान : 207868
नोटा : 886
अवैध मते : 94
रद्द केलेली मते : 00


प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 


उमेदवार                  पक्ष          मिळालेली मते


हरीश पिंपळे           भाजप       91820
सम्राट डोंगरदिवे       राष्ट्रवादी शरद 55956
डॉ. सुगत वाघमारे    वंचित         49608


भाजपचे हरीश पिंपळे 35864 मतांनी विजयी 


मुर्तिजापूर मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 


भाजपाचे हरीश पिंपळे 1,910 मतांनी विजयी


उमेदवार                   पक्ष             मते 
हरिश पिंपळे             भाजप       59527
प्रतिभा अवचार          वंचित        57617
रविकुमार राठी          राष्ट्रवादी      41155


मुर्तिजापूर मतदारसंघातील एकुण मतदारसंख्या : 


स्त्री : 151121
पुरूष : 158629
तृतीयपंथी : 05
एकूण : 309755


2019 च्या निवडणुकीत भाजपाचे हरीश पिंपळे यांनी फक्त 1910 मतांनी हा मतदारसंघ राखत तिसऱ्यांदा विजयश्री प्राप्त केली होती. मात्र, चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जातांना त्यांचा पहिला संघर्ष असेल तो तिकीट मिळविण्यासाठी. त्यानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोधाला मोठं तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या अनुप धोत्रेंना काँग्रेसपेक्षा 8147 मतांची आघाडी मिळाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या वेळच्या वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांचा 1910 मतांनी थोडक्यात पराभव झाला होता.