प्राप्तिकर भरताना आपले पैसे कसे वाचतील यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. आपला कर वाचवताना प्राप्तिकर कायद्यातील अधिनयम 80 C चा उपयोग सर्सास केला जातो. मात्र या अधिनियमाव्यतिरिक्त अन्य तरतुदींच्या माध्यमातूनही तुम्ही तुमचा कर वाचवू शकता. हा कर कसा वाचता येईल? त्यासाठी कोणकोणते कायदेशीर मार्ग आहेत? हे जाणून घेऊ या... 


1. सेक्शन 80CCD


सेक्शन 80CCD अंतर्गत नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) किंवा अटल पेन्शन योजनेत (APY) योगदान देणाऱ्या व्यक्तीला कर कपातीचा दावा करता येतो. यामध्येही आणखी दोन उपकलम आहेत.


2. धारा 80D


कलम 80 अंतर्गत करदात्यांना जोडीदार, मुलं, आई-वडील यांच्यासाठी काढलेल्या आरोग्यवीम्याच्या कपातीची मदत घेऊन करात सुट मागता येते. 


स्वत: व्यक्ती + परिवार (मुलं आणि जोडीदार) यांच्यासाठी 25,000 रुपयांपर्यंत सूट


स्वत: व्यक्ती + परिवार + आई-वडील यांच्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत सूट 


स्वत: व्यक्ती + परिवार (60 वर्षांपेक्षा कमी वय) + आई-वडील (60 वर्षांपेक्षा कमी वय) यांच्यासाठी 75,000 रुपयांपर्यंत सूट मागता येते 


स्वत: व्यक्ती+ परिवार (60 वर्षांपेक्षा कमी वय) + वरिष्ठ नागरिक आई-वडील यांच्यासाठी 1,00,000 रुपयांपर्यंत सूट मागता येते. 


3. 80E


करदात्याने आपल्या जोडीदारासाठी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज काढले असेल तर त्या कर्जाच्या व्याजावर कर कपातीचा दावा करता येतो.  


4. धारा 80GG


कलम 80GG अंतर्गत ज्या लोकांना एचआरए मिळत नाही असे करदाते घरभाड्यावर कर कपात करण्याचा दावा करू शकतात. 


हेही वाचा :


देशात सुपर रिच टॅक्स लावा, गरिबी दूर होणार, तीन चतुर्थांश भारतीयांचे मत!


आयटीआर भरताना 'या' साध्या-साध्या चुका पडू शकतात महागात; होऊ शकते मोठी अडचण!


सोमवार तुमच्यासाठी ठरू शकतो लकी! फक्त 'या' दहा पेनी स्टॉक्सवर नजर ठेवल्यास मालामाल होण्याची संधी