Maha Vikas aghadi press conference Nana Patole: राज्यातील महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा संपुष्टात आला आहे. आमच्या कार्यर्त्यांनी मोठं मन केलं आहे. भाजपचे पाणीपत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केलं. आमचे सगळे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असे पटोले म्हणाले. महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी होतील असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला. 


काँग्रेस  मोठा पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचं मोठं योगदान आहे. सोनिया गांधी यांची तब्बेत चांगली नसतानाही त्यांनी ईडी कार्यालयात बसवून ठेवलं. मुंबईच्या मंत्रालय परिसरातील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात ही संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी नाना पटोले बोलत होते. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते.


कोणत्या पक्षाला किती जागा?


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये तिन्ही पक्षाचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे. अखेर सांगलीची जागा ठाकरे गटालाच मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 21 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला10 आणि काँग्रेस पक्षाला 17 जागा देण्यात आल्या आहेत. 


काँग्रेसला मिळालेल्या 17 जागा कोणत्या?



अखेर सांगली काँग्रेसला नाहीच, विशाल पाटलांच्या भूमिकेकडं राज्याचं लक्ष


दरम्यान, काँग्रेसला जरी 17 जागा मिळाल्या असल्या तरी सांगली लोकसभेचा जागा मात्र, ठाकरे गटालाच मिळाली आहे. कारण या जागेवरुन महाविकास आघाडीत मोठा तिढा निर्माण झाला होता. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा काँग्रेस लढणारच असा पवित्रा काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी घेतला होता. मात्र, अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. त्यामुळं आता या जागेवरुन विशाल पाटील काय निर्णय घेणार? ते निवडणूक लढवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर विशाल पाटील किंवा विश्वजीत कदम यांची कोणताही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळं ते आता काय निर्णाय घेणार याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. 


महत्वाच्या बातम्या:


MVA PC: महाविकास आघाडीचा तिढा सुटला! अंतिम जागावाटप जाहीर, कोण कुठून लढवणार लोकसभा?