Madhya Pradesh Election Exit Poll : देशाचं लक्ष लागलेल्या मध्य प्रदेशच्या विधानसभेसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. त्यामध्ये 80 टक्के मतदारांनी आपले मतदान केलं. त्यामुळे 230 जागा असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) हे भाजपची सत्ता कायम ठेवतात की काँग्रेसचे कमलनाथ (Kamal Nath) बाजी मारतात हे 3 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. पण त्या आधी एक्झिट पोलची आकडेवारी (Madhya Pradesh Exit Poll) समोर आली आहे. 


मध्य प्रदेशमध्ये भाजपला सत्ता गमावण्याची शक्यता असून काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये काँग्रेसला 125 जागा मिळण्याची शक्यता असून भाजपला 100 जागावर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. 


मध्य प्रदेशमधील एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते? (Madhya Pradesh Election Exit Poll) 



  • काँग्रेस - 125 

  • भाजप - 100

  • बसपा - 02 

  • एकूण जागा - 230 


मध्य प्रदेश विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबल (Madhya Pradesh Election Result 2018) 



  • भाजप - 165 

  • काँग्रेस - 58

  • बहुजन समाज पक्ष - 4

  • इतर - 3 


मध्य प्रदेशमध्ये 'ऑपरेशन लोटस'


ऑपरेशन लोटसचा यशस्वी प्रयोग करत 2018 साली निवडणुकीत गेलेली सत्ता ही मागच्या दरवाजाने भाजपनं मिळवली. त्यानंतर कमलनाथ यांना हटवून परत एकदा शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्री केलं. मात्र या निवडणुकीत भाजपला केंद्रातून आपले मंत्री राज्यात पाठवून, निवडणूक लढवावी लागली. 


प्रत्येक निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणाऱ्या भाजपनं पहिल्यांदाच कोणत्याही नावाची घोषणा नाही. तिकीटाची घोषणा होतानासुद्धा शिवराज सिंह चौहान यांना देव पाण्यात घालून बसावं लागलं होतं. भाजपनं अपेक्षेप्रमाणे आपला प्रचार हिंदू मतांभोवतीच सुरु केला. सरकार आलं तर अयोध्येतील राम मंदिरांचं मोफत दर्शनाची सोय करु अशी घोषणा अमित शाहांनी केली. 


काँग्रेसचं मोठं आव्हान


मुख्यमंत्री शिवराज यांनी सुरू केलेली 'लाडली बहना' ही योजना फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनंही रणनीती बदलत या योजनेला काट देणारी नारी सन्मान योजना देऊ असे म्हणत घोषणा केली. मध्य प्रदेशातली निवडणूक ज्येष्ठ नेते कमलनाथ सेंट्रिक केली. कमलनाथ यांनी सॉफ्ट हिंदुत्ववादी भूमिका घेत, शिवराज यांच्या नीतींचा विरोध केला. त्यातच राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेचा मुद्दा प्रचारात आणत भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं. ऑपरेशन लोटस, आदिवासींचे हक्क आणि शिवराज यांच्या विरोधातील नाराजी याच मुद्द्यांना प्रचारात केंद्रस्थानी आणत काँग्रेसनं सत्तेसाठी मोठी दावेदारी उभी केली.


इंडिया आघाडीत फूट


असं असलं तरी काँग्रेसच्या नेतृत्वात उभी होणारी विरोधकांच्या इंडिया आघाडीत मात्र इथं फूट पडली. सपा, बसपा आणि आम आदमी पक्षानं पाच ते सात मतदारसंघात उमेदवार उभे केले. जर 2018 प्रमाणे निकाल लागला तर याच पक्षांची भूमिका निर्णायक ठरेल. शिवाय गेल्या निवडणुकीत मध्य प्रदेशात पाच लाख 40 हजार मतदारांनी नोटाचा पर्याय वापरला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांना नोटाची धास्ती असणार आहे. 


ही बातमी वाचा: