सोलापूर :  माढा विधानसभा मतदारसंघात (Madha Vidhan Sabhe Election)  एका बाजूला महाविकास आघाडीकडे (Maha Vikas Aghadi) उमेदवारीसाठी जोरदार घमासान सुरू असताना आता महायुतीतील ही जागा अजित पवार गटाकडे गेल्याने नाराज झालेले एकनाथ शिंदे सेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांनी बंडखोरी करण्याचे भूमिका जाहीर केली आहे. प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी राव सावंत यांचे ज्येष्ठ बंधू असून गेले तीस वर्ष शिवसेनेत विविध पदावर ते काम करीत आहेत. माढा विधानसभेत सावंत गटाची मोठी ताकद असून यापूर्वी दोन वेळेला सावंत यांनी माढ्यातून विधानसभा निवडणूक लढवली होती. माढा मतदारसंघातील गावोगावी सावंत यांचा एक गट कार्यरत असून पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातही सावंत यांची मोठी ताकद आहे. 


महायुतीमध्ये माढा विधानसभेची जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेली असून येथील त्यांचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी मात्र महायुतीतून निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या अजितदादांकडे उमेदवारच नसला तरी ते अद्याप या जागेवरचा हक्क सोडायला तयार नसून त्यामुळे महायुतीत नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. प्रत्येक निवडणुकीत आमदार शिंदे गटाला कडाडून विरोध करणाऱ्या सावंत यांच्यावर शिवसैनिकांकडून दबाव वाढू लागल्याने अखेर सावंत यांनी बंडखोरी करण्याची भूमिका घेत अपक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायचे शेवटच्या दिवशी प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे आपली उमेदवारी दाखल करणारा असून आता कोणाचाही दबाव आला तरी न झोपता शिवसैनिकांना घेऊन विधानसभेची ही निवडणूक लढवणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले आहे . महायुतीकडे अजूनही माढ्यासाठी उमेदवार नसून अशा वेळेला अजितदादांनी ही जागा सोडावी अशी महायुतीतील घटक पक्षांची भूमिका होती. मात्र अजितदादांनी अजूनही माढ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षात मोठी नाराजी आहे.


महायुतीची उमेदवारी घेणार नाही,शिवाजी सावंत यांची स्पष्ठ भूमिका


 वाड्याचे अजित दादा गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांनाही शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याचे अजून निश्चित झाले नसले तरी आपण तुतारी नाही मिळाली तर अपक्ष निवडणूक रिंगणात उतरू मात्र महायुतीची उमेदवारी घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका याआधीच आमदार शिंदे यांनी घेतल्याने महायुतीतही शिंदे यांच्या विरोधात मोठी संतापाची लाट आहे. अजूनही अजित दादा हे आमदार शिंदे परत उमेदवारी मागायला येतील याची वाट पाहत आहेत का असा संतप्त सवाल शिवसैनिकांकडून होत असून शिवाजी सावंत यांना कोणत्याही परिस्थितीत कोणताही पक्ष न घेता आता निवडणूक रिंगणात उतरू आणि आपण आपली ताकद दाखवू अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळेच आता 29 ऑक्टोबर रोजी शिवाजी सावंत हे माढा विधानसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


हे ही वाचा :


मोठी बातमी: बड्या नेत्याचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांनी दिल्ली गाठली, अमित शाहांना भेटून मनसुबे उधळणार