परभणी लोकसभा मतदार संघ हा 25 वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. मात्र यंदा काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यांनी शिवसेनेकडे आपल्याला तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे.
काल भाजप-सेना युतीचे समन्वयक अर्जुन खोतकर यांनी परभणीत येऊन बोर्डीकर यांच्या निवासस्थानी विद्यमान खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, रामप्रसाद बोर्डीकर, मेघना बोर्डीकर तसेच भाजप शिवसेनेतील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. हा तिढा सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केले, मात्र मेघना ह्या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. यामुळे आता उद्या रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यात काही तोडगा निघतो का हे बघावं लागणार आहे.