लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी
एबीपी माझा वेब टीम | 10 Mar 2019 01:30 PM (IST)
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सोळाव्या लोकसभेचं महाराष्ट्रातील आणि देशभरातील चित्र कसं आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : सतराव्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. आज (रविवार 10 मार्च) संध्याकाळी पाच वाजता राजधानी दिल्लीत निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष निवडणुकांच्या तारखांकडे लागून राहिलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सोळाव्या लोकसभेचं महाराष्ट्रातील आणि देशभरातील चित्र कसं आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागा (48) भाजप -22 शिवसेना - 18 राष्ट्रवादी - 05 काँग्रेस - 02 स्वाभिमानी शेतकरी संघटना - 01 लोकसभा निवडणूक 2014 : देशभरातील पक्षीय बलाबल मुंबई- कोकण (12 जागा) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत - शिवसेना दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे - शिवसेना उत्तर पश्चिम मुंबई - गजानन कीर्तीकर - शिवसेना उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन - भाजप उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी - भाजप ईशान्य मुंबई - किरीट सोमय्या - भाजप ठाणे - राजन विचारे - शिवसेना कल्याण - श्रीकांत शिंदे - शिवसेना भिवंडी - कपिल पाटील - भाजप रायगड - अनंत गीते - शिवसेना रत्नागिरी, सिंधुदुर्ग - विनायक राऊत - शिवसेना पालघर - राजेंद्र गावित- भाजप पश्चिम महाराष्ट्र (10 जागा) पुणे 1. पुणे शहर - अनिल शिरोळे - भाजप 2. मावळ - श्रीरंग बारणे - शिवसेना 3. शिरुर - शिवाजीराव आढळराव पाटील - शिवसेना 4. बारामती - सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी सातारा - उदयनराजे भोसले - राष्ट्रवादी सांगली - संजय पाटील - भाजप कोल्हापूर - 1. कोल्हापूर शहर - धनंजय महाडिक - राष्ट्रवादी 2. हातकणंगले - राजू शेट्टी - स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर - 1. सोलापूर शहर - शरद बनसोडे - भाजप 2. माढा - विजयसिंह मोहिते पाटील - राष्ट्रवादी VIDEO | आली समीप घटिका, लोकसभा निवडणुकांची आज संध्याकाळी घोषणा उत्तर महाराष्ट्र (8 जागा) नाशिक - हेमंत गोडसे - शिवसेना दिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाण - भाजप रावेर - रक्षा खडसे - भाजप जळगाव - अशोक पाटील - भाजप धुळे - सुभाष भामरे - भाजप नंदुरबार - हीना गावित - भाजप शिर्डी - सदाशिव लोखंडे - शिवसेना अहमदनगर - दिलीप गांधी - भाजप मराठवाडा (8 जागा) नांदेड - अशोक चव्हाण - काँग्रेस हिंगोली - राजीव सातव - काँग्रेस औरंगाबाद - चंद्रकांत खैरे - शिवसेना परभणी – संजय जाधव - शिवसेना उस्मानाबाद - रवींद्र गायकवाड - शिवसेना जालना - रावसाहेब दानवे - भाजप बीड - प्रीतम मुंडे - भाजप लातूर - सुनील गायकवाड - भाजप विदर्भ (10 जागा) बुलडाणा - प्रतापराव जाधव - शिवसेना अकोला - संजय धोत्रे - भाजप अमरावती - आनंदराव अडसूळ - शिवसेना वर्धा - रामदास तडस - भाजप रामटेक - कृपाल तुमाणे - शिवसेना नागपूर - नितीन गडकरी - भाजप भंडारा-गोंदिया - मधुकर कुकडे - राष्ट्रवादी गडचिरोली-चिमुर - अशोक नेते - भाजप चंद्रपूर - हंसराज अहिर - भाजप यवतमाळ-वाशिम - भावना गवळी - शिवसेना