Gujarat Election News: देशात यंदाच्या लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) या महत्त्वपूर्ण असणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या आधी गुजरातमधील (Gujarat) राजकीय हालचालींना बराच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या आधी एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामधून गुजरातमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे सर्वेक्षण टाइम्स नाऊ नवभारत आणि ETQ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे. 


गुजरातमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याची शक्यता? 


आताच्या घडीला जर लोकसभेच्या निवडणुका लागल्या तर भाजपची चांगलीच प्रगती होणार असल्याचं चित्र सध्या आहे. सर्वेक्षणानुसार, लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरातमध्ये भाजपला 26 जागा मिळू शकतात. पण गुजरातमध्ये 'आप'ला मात्र एकही जागा मिळणार नसल्याची शक्यता या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. तसेच गुजरातमध्ये काँग्रेसला देखील शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, गुजरातमध्ये भाजप सोडून अनेक मोठ्या पक्षांची पिछेहाट झाली आहे. तसेच अनेक पक्षांना लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरातमध्ये जागा मिळणार नसल्याचा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. 


कोणला किती मतं मिळण्याची शक्यता? 


लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळतील हा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, 60.70 टक्के मतदान हे भाजपच्या बाजूने होण्याची शक्यता आहे. तर 'आप'ला या निवडणुकांमध्ये  7.80 टक्के मतदान मिळणार असल्याचा अंदाज या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या बाजूने आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये 27.60 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या बाजून  3.90 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. 


लोकसभा निवडणुकांसाठी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?



भाजप - 26 जागा
आप - शून्य जागा
काँग्रेस - शून्य जागा
इतर - शून्य जागा


गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान मिळणार?


भाजप - 60.70  टक्के
आप - 7.80 टक्के
काँग्रेस - 27.60 टक्के
इतर - 3.90 टक्के


त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मात्र यामध्ये जनता कोणाला कौल देणार या प्रश्नाचे उत्तर आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्येच मिळणार आहे. त्यामुळे यासाठी आता राजकीय पक्ष कोणत्या नव्या रणनिती आखणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या निवडणुकांच्या रिंगणात कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचं पारडं जड ठरणार याची उत्सुकता आता संपूर्ण देशाला लागून राहिली आहे. 


हे ही वाचा :