Loksabha Election Voting News : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) माहोल सुरु आहे. आत्तापर्यंत देशात चार टप्प्यात मतदान voting) प्रक्रिया पार पडली आहे. आणखी देशात मतदानाचे तीन टप्पे बाकी आहेत. पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. दरम्यान, आत्तापर्यंत चार टप्प्यात नेमकं किती लोकांनी मतदानाचा हक्क बजावला? तसेच चार टप्प्यात एकूण किती मतदान झाले? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
आतापर्यंत 45 कोटी 10 लाख लोकांनी बजावला मतदानाचा हक्क
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या चार टप्प्यात देशात 66.95 टक्के मतदान झाले आहे. तर आतापर्यंत 45 कोटी 10 लाख लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदारांनी आगामी टप्प्यांमध्ये मोठ्या संख्येनं मतदान करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगानं आवाहन केलं आहे. आणखी देशात मतदानाचे तीन टप्पे बाकी आहे. यातील पुढचा टप्पा हा 20 मे रोजी होणार आहे. तर सहावा टप्पा हा 25 मे आणि सातवा शेवटचा टप्पा हा 1 जूनला होणार आहे. या काळात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असं आवाहन करण्यात आलं आहे.
मोठ्या प्रमाणावरील मतदान हा भारतीय मतदारांचा जगाला संदेश
दरम्यान, उर्वरित 3 टप्प्यांमध्ये मतदारांना माहिती देणे, प्रोत्साहित करणे आणि सुविधा देणे यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मुख्य निवडणूक आयुक्तांनी सूचना केली आहे. मोठ्या प्रमाणावरील मतदान हा भारतीय मतदारांचा जगाला संदेश असल्याचे मत केंद्रीय निवडणूक आयोगान म्हटलं आहे. मतदार जनजागृतीमध्ये करणं गरजेचं असल्याच देखील म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या: