मुंबई : सध्या भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) जागतिक पातळीवरील घडामोडी काहीशा पुरक ठरत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शुक्रवारी शेअर बाजार बढतीसही बंद झाला. शुक्रवारी सत्राच्या शेवटी गुंतवणूकदारांनी अनेक शेअर्स खरेदी केले. परिणामी सेन्सेक्स सावरला. दरम्यान, शुक्रवारी बाजारातील तेजी पाहून मार्केट गुरु अनिल सिंघवी यांनी एक पीएसयू स्टॉक सजेस्ट केला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास आगामी तीन वर्षांत तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो, असे त्यांनी सूचवले आहे.


सिंघवी यांनी सूचवला हा स्टॉक


अनिल सिंघवी यांनी पीएसयू स्टॉक कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Concor) या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास सूचवले आहे. सध्या पीएसयू सेक्टरमधील सर्वांत स्वस्त शेअर्समध्ये या शेअरचा समावेश आहे, असे सिंघवी यांचे मत आहे. सिंघवी यांच्या मतानुसार कॉनकोर कंपनीने नुकतेच आपल्या आगामी आर्थिक नियोजनाबाबत सांगितले आहे. सरकारी कंपन्यांपैकी या कंपनीने आतापर्यंतचा सर्वांत चांगला प्लॅन सादर केला आहे. या कंपनीने वित्त वर्ष 2024-25 मध्ये 18 ते 20 टक्के व्हॅल्यूम ग्रोथ करू, असे सांगितले आहे. या कंपनीचा चालू आर्थिक वर्षाचा ग्रोथ रेट हा 8.2 टक्के आहे. आगामी काळात आम्ही अडीच टक्क्यांची ग्रोथ करू, असे या कंपनीने सांगितले आहे. या कंपनीने एका वर्षात कॉस्ट सेव्हिंगच्या माध्यमातून साधारण 300 कोटी रुपये वाचवले आहे. ही कंपनी रेल्वे विभागातर्फे वापरण्यात न येणाऱ्या जागेला सरेंडर केले जाण्यावर विचार करत आहे.


तीन वर्षांत शेअर दुप्पट होणार?


या सर्व कारणांमुळे अनिल सिंघवी यांच्या मतानुसार कॉनकोर या कंपनीचा शेअर आगामी काळात चांगली कामगिरी करेल. या कंपनीचे शेअर खरेदी करताना टार्गेट प्राईज 1250 रुपये प्रति शेअर ठेवायला हवा. या कंपनीचे भविष्यातील सर्व नियोजन यशस्वी ठरले तर आगामी तीन वर्षांत हा शेअर दुप्पट होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (17 मे)  हा शेअर 4.80 टक्क्यांनी वाढून 1087.75 वर बंद झाला.


Concor Q4 च्या निकालात नेमके काय?


कंटेनर  कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (कॉनकोर) या कंपनीचा गेल्या वित्त वर्षातील कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट 9.88 टक्क्यांनी वाढून थेट 301.25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याआधीच्या वित्त वर्षात याच तिमाहीत या कंपनीने 274.14 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.  


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


शेअर मार्केटमध्ये आला नवा स्कॅम, 'पिग बुचरिंगचे' शिकार झाल्यास होणार बँक खाते रिकामे!


मोदींनी 9 लाख गुंतवले, आता मिळणार 13 लाख रुपये, पोस्टाची 'ती' योजना आहे तरी काय?


पगार 10 लाख रुपये असला तरी शून्य कर, कसं शक्य आहे? जाणून घ्या नेमका फंडा काय?


SIP करताना 'ही' एक काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान झालंच म्हणून समजा!