Election Commission, Delhi : "सोशल मीडियावर कोणीही ईव्हीएम घेऊन बसते. काहीजण सोशल मीडियावर तज्ज्ञ बनतात. त्यांची डिग्री कोणती आहे. ते पण पाहिले पाहिजे. ते सांगतात की हा डब्बा आहे. टूलबॉक्सप्रमाणे असतो. त्यामध्ये काय आहे, हे माहिती नाही. त्यातून एक स्लीप पण निघते. त्यात ते दाखवतात की, मी बटन दाबलं आणि स्लीप वेगळी आली. त्याला काही अर्थ नसतो",असं म्हणत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट केली.  निवडणूक आयोगाने आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 


ईव्हीएमबाबत मी अनेकदा बोललो आहे


राजीव कुमार म्हणाले, ईव्हीएमबाबत मी अनेकदा बोललो आहे. ठीक आहे तुम्ही पुन्हा एकदा मला याबाबत विचारत आहात. देशात ईव्हिएमबाबत एक अभियान देखील सुरु आहे. त्यामुळे यावर भाष्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे विस्तारित रुपाने यावर बोलतो. यापूर्वीही अनेकदा बोललो आहे. 


प्रत्येकवेळी या याचिका न्यायालयांनी फेटाळल्या


पुढे बोलताना राजीव कुमार म्हणाले, ईव्हीएमला आव्हान देणाऱ्या याचिका समोर आल्या तेव्हा देशातील संविधानिक न्यायालयांनी म्हणजेच उच्च न्यायालयांनी आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांना उत्तरे दिली आहेत. ईव्हिएमला कशा पद्धतीने आव्हान देण्यात आले? न्यायालयात त्यांनी सांगितलं की, ईव्हिएम मशीन हॅक होऊ शकते. चोरी केली जाते. 19 लाख मशीन गायब आहेत. यामध्ये दिसत नाही. ही कम्प्युटरमुळे खराब होते. मशीनमुळे निकाल बदलले जाऊ शकतात. मात्र, प्रत्येकवेळी या याचिका न्यायालयांनी फेटाळल्या आहेत, असंही राजीव कुमार यांनी नमूद केलं. 


ईव्हिएम मशीनला वायरस लागत नाही


न्यायालयाने प्रत्युतर देताना म्हटले की, ईव्हिएम मशीनला वायरस लागत नाही. अवैध पद्धतीने यावर मतदान केले जाऊ शकत नाही. सेक्शन 61 नुसार  एकाऐवजी 5 व्हिव्हीपॅट मोजा, असंही न्यायालयाने म्हटलं. आता न्यायालयाने दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयाने एका प्रकरणात 50 हजारांचा दंड ठोठावलाय. काही अडचणी असतील तर आम्हाला विचारा. किती वेळ न्यायालयात जाणार आहात, असा सवालही राजीव कुमार यांनी यावेळी बोलताना केला. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Politics : कौटुंबिक त्रासामुळे विजय शिवतारेंची किडनी फेल, उगाच अजितदादांवर खापर फोडू नका, नाहीतर...; उमेश पाटलांचा इशारा