सोलापूर : सोलापूर लोकसभेची निवडणूक तिरंगी होणार हे आता स्पष्ट झालं आहे. महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, महायुतीतर्फे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि बहुजन वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. सोलापूर मतदारसंघाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या तिन्ही उमेदवारांनी सोमवारी (25 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांची संपत्ती मिळून 3 कोटींपेक्षा जास्त आहे. 2014-15 च्या तुलनेत 2018-19 मध्ये त्यांच्या उत्पन्नात जवळपास 7 लाखांची वाढ झाली आहे. तर सुशीलकुमार शिंदेंवर 37 लाखांचं तर त्यांच्या पत्नीवर 10 लाखांचं कर्ज आहे. 2014-15 च्या तुलनेत त्यांचं उत्पन्न सुमारे 22 लाखांनी वाढलं आहे. याशिवाय महायुतीचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची जंगम मालमत्ता 6 लाखांची तर स्थावर मालमत्ता 2 कोटींची आहे. शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी तिन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही उमेदवारांनी पदयात्रा काढत शक्तीप्रदर्शन केलं. तर महायुतीने सोलापुरातील हेरिटेज हॉल इथे मेळावा घेत कार्यकर्त्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न केला. सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत या तिन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आधी काँग्रेस आणि भाजप मध्ये होणारी ही लढत प्रकाश आंबेडकरांच्या शिरकावामुळे तिरंगी होणार आहे. * या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत! 1. प्रकाश आंबेडकर (बहुजन वंचित आघाडी) 2. डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी (भाजप) 3. सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस) * तिन्ही उमेदवारांची मालमत्ता प्रकाश आंबेडकर यांची मालमत्ता (प्रकाश आंबेडकर, पत्नी अंजली आंबेडकर, आणि मुलगा सुजात आंबेडकर)
करप्राप्त उत्पन्न *आर्थिक वर्ष 2014-15 प्रकाश आंबेडकर - 1 लाख 61 हजार 100 रुपये अंजली आंबेडकर - 12 लाख 95 हजार 60 रुपये *आर्थिक वर्ष 2018-19 प्रकाश आंबेडकर - 8 लाख 60 हजार 190 रुपये अंजली आंबेडकर - 21 लाख 09 हजार 140 रुपये *जंगम मालमत्ता प्रकाश आंबेडकर - 41 लाख 81 हजार 189 रुपये अंजली आंबेडकर - 73लाख 86 हजार 273 रुपये सुजात आंबेडकर - 9 लाख 55 हजार 454 रुपये *स्थावर मालमत्ता प्रकाश आंबेडकर - 32 लाख अंजली आंबेडकर - 1 कोटी 15 लाख संयुक्त - 3 कोटी 15 लाख *मालकीचं एकही वाहन नाही *कोणत्याही स्वरुपाचं कर्ज नाही *फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि वेबसाईट आहे ---------- सुशीलकुमार शिंदे यांची मालमत्ता (पत्नी उज्ज्वला शिंदे आणि स्वतः सुशीलकुमार शिंदे यांचे उत्पन्न)
करप्राप्त उत्पन्न - *आर्थिक वर्ष 2013-14 सुशीलकुमार शिंदे - 57 लाख 91 हजार 180 रुपये उज्ज्वला शिंदे - 6 लाख 24 हजार 410 रुपये *आर्थिक वर्ष 2018-19 सुशीलकुमार शिंदे - 79 लाख 60 हजार 480 रुपये उज्ज्वला शिंदे - 1 कोटी 2 लाख 32 हजार 880 रुपये *जंगम मालमत्ता सुशीलकुमार शिंदे - 11 कोटी 36 लाख 31 हजार 124 रुपये उज्ज्वला शिंदे - 6 कोटी 59 लाख 13 हजार 237 रुपये *स्थावर मालमत्ता   सुशीलकुमार शिंदे -9 कोटी 96 लाख 88 हजार 21 रुपये उज्वला शिंदे - 10 कोटी 11 लाख 26 हजार 321 रुपये *वाहन 2 ट्रॅक्टर, 1 फॉर्च्युनर कार, 1 टेम्पो *कर्ज सुशीलकुमार शिंदे - 37 लाख 50 हजार रुपये उज्ज्वला शिंदे - 10 लाख रुपये *सोशल मीडियावर एकही अकाऊंट नाही ---------- डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य मालमत्ता (कुटुंबात कोणीही नाही)
*मागील पाचवर्षात करप्राप्त उत्पन्न नाही *त्यांच्या नावे पॅन कार्डही नाही *जंगम मालमत्ता : सध्या 6 लाख 46 हजार 79 रुपये *स्थावर मालमत्ता : 2 कोटी 72 लाख 24 हजार *विशेष म्हणजे महास्वामींचे 4 साखर कारखान्यात शेअर देखील आहेत *कोणत्याही प्रकारचं कर्ज किंवा देणे नाही *वाहन : एक ॲम्बेसेडर चारचाकी *महास्वामी सोशल मीडियावर नाहीत