मुंबई : लोकसभेच्या निवडणुकांचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. राज्यात बहुतांश महायुती, महाआघाडी, मित्रपक्षांसह वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. काही जागांवर अद्याप उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नाहीये. मात्र राज्यातील बहुतांश जागांवर कुणाच्या विरोधात कोण लढणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यातील 30 जागांवरील मुख्य लढती अशा असतील.


WATCH | महाराष्ट्रात लोकसभेच्या रिंगणात कुणाची कुणाशी लढत? | आमने-सामने लढती | एबीपी माझा



शिवसेना भाजप युतीच्या पाच जागा जाहीर झालेल्या नाहीत.  भंडारा- गोंदिया, पालघर, ईशान्य मुंबई,  सातारा, माढा या जागांवरील उमेदवारांची घोषणा झालेली नाही. तर दुसरीकडे, महाआघाडीची आज घोषणा होणार आहे, मात्र तब्बल 14 ठिकाणची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. जळगाव, रावेर, भंडारा- गोंदिया, अमरावती, अकोला, रामटेक, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, पालघर,  मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,  पुणे,  सांगली,  हिंगोली,  नांदेड या जागांवर महाआघाडीचे उमेदवार घोषित झालेले नाही.


अशा असतील थेट लढती

1.    सोलापूर- सुशीलकुमार शिंदे (CONG) विरुद्ध  जयसिध्देश्वराय स्वामी (BJP)

2.    बारामती- सुप्रिया सुळे (NCP) विरुद्ध  कांचन कुल ( BJP)

3.    दिंडोरी-  धनराज महाले (NCP) विरुद्ध  डॉ.भारती पवार ( BJP)

4.    चंद्रपूर- विनायक बांगडे  ( CONG) विरुद्ध  हंसराज अहिर (BJP)

5.    भिवंडी-  सुरेश तावरे ( CONG) विरुद्ध  कपिल पाटील (BJP)

6.    औरंगाबाद- सुभाष झांबड (CONG) विरुद्ध  चंद्रकांत खैरे ( SENA)

7.    जालना- विलास औताडे ( CONG) विरुद्ध  रावसाहेब दानवे (BJP)

8.    लातूर-  मच्छिंद्र कामंत ( CONG) विरुद्ध  डॉ. सुधाकर शृंगारे (BJP)

9.    नाशिक- समिर भुजबळ(NCP) विरुद्ध  हेमंत गोडसे (SENA)

10.    बुलडाणा-  राजेंद्र शिंगणे( NCP) विरुद्ध  प्रतापराव जाधव (SENA)

11.    यवतमाळ- माणिकराव ठाकरे (CONG) विरुद्ध  भावना गवळी ( SENA)

12.    रायगड-  सुनिल तटकरे(NCP)  विरुद्ध  अनंत गिते (SENA)

13.    कल्याण- बाबाजी पाटील(NCP) विरुद्ध  श्रीकांत शिंदे (SENA)

14.    ठाणे- आनंद परांजपे(NCP) विरुद्ध  राजन विचारे (SENA)

15.    मुंबई दक्षिण मध्य-  एकनाथ गायकवाड (CONG) विरुद्ध  राहुल शेवाळे (SENA)

16.    मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा (CONG) विरुद्ध  अरविंद सावंत (SENA)

17.    मावळ- पार्थ पवार(NCP) विरुद्ध  श्रीरंग बारणे( SENA)

18.    शिरुर- अमोल कोल्हे(NCP) विरुद्ध  शिवाजीराव आढळराव (SENA)

19.    शिर्डी- भाऊसाहेब कांबळे (CONG) विरुद्ध  सदाशिव लोखंडे (SENA)

20.    कोल्हापूर- धनंजय महाडिक(NCP) विरुद्ध  संजय मंडलिक (SENA)

21.    हातकणंगले- राजू शेट्टी ( स्वाशेसं)  विरुद्ध  धर्यशील माने (SENA)

22.    परभणी- राजेश विटेकर (NCP) विरुद्ध  संजय जाधव (SENA)

23.    नंदुरबार ( एसटी)-  के. सी पाडवी (CONG) विरुद्ध  हिना गावित (BJP)-

24.    धुळे-  कुणाल पाटील (CONG) विरुद्ध  डॉ. सुभाष भामरे (BJP) –

25.    वर्धा- चारुलता टोकस (CONG) विरुद्ध  रामदास तडस (BJP) –

26.    नागपूर-  नाना पटोले (CONG) विरुद्ध  नितीन गडकरी (BJP) –

27.    गडचिरोली-  डॉ. नामदेव उसेंडी( CONG)  विरुद्ध  अशोक  नेते

28.    मुंबई- उत्तर-मध्य-  प्रिया दत्त (CONG) विरुद्ध  पूनम महाजन (BJP)

29.    अहमदनगर-  संग्राम जगताप (NCP) विरुद्ध  डॉ. सुजय विखे पाटील (BJP)

30.    बीड-   डॉ. प्रीतम मुंडे (BJP) विरुद्ध  बजरंग सोनवणे(NCP)

संबंधित बातम्या

लोकसभा निवडणूक : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा
लोकसभा निवडणूक : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट

लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी, महाराष्ट्रातील 21 उमेदवार जाहीर

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा

काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, माणिकरावांसह एकनाथ गायकवाडांना उमेदवारी

लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात

लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार