WATCH VIDEO | भाजपची दुसरी यादी जाहीर, पुण्यातून गिरीश बापट तर बारामतीत कांचन कुल यांना उमेदवारी | एबीपी माझा
तिकिटं कापण्यात आलेल्या विद्यमान खासदारांमध्ये पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील, दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा समावेश आहे.
दरम्यान जळगावमध्ये एकनाथ खडसेंऐवजी गिरीश महाजन यांच्या गटाच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तसेच बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर दिंडोरीमधून चव्हाणांच्या जागी डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपचे दुसऱ्या यादीतील उमेदवार
पुणे - गिरीश बापट
दिंडोरी - डॉ. भारती पवार
जळगाव - स्मिता वाघ
सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी
बारामती - कांचन कुल
भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा
दरम्यान, भाजपची पहिली उमेदवार यादी 21 मार्च रोजी घोषित झाली होती. लोकसभा निवडणुकीसाठी देशात भाजपच्या 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा केली होती. ज्यात 14 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
भाजप महाराष्ट्रात 25 जागा लढवणार आहे. भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. लातूरमध्ये सुधाकरराव शृंगारे, तर अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सुधाकर शृंगारे हे लातूरच्या वडवळ-नागनाथ गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. सुधाकर शृंगारे बौद्ध समाजाचे असून व्यवसायाने बिल्डर आहेत. शिवाय ते पैशांनी प्रबळ उमेदवार असल्याचं कळतं.
तर सुजय विखे पाटील नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते पुत्र आहेत.
भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार
- नंदुरबार - हीना गावित
- धुळे - सुभाष भामरे
- रावेर- रक्षा खडसे
- अकोला - संजय धोत्रे
- वर्धा - रामदास तडस
- नागपूर - नितीन गडकरी
- गडचिरोली-चिमुर - अशोक नेते
- चंद्रपूर- हंसराज अहिर
- जालना - रावसाहेब दानवे
- भिवंडी - कपिल पाटील
- मुंबई उत्तर - गोपाळ शेट्टी
- मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन
- अहमदनगर - सुजय विखे पाटील
- बीड - डॉ. प्रीतम मुंडे
- लातूर - सुधाकरराव शृंगारे
- सांगली - संजयकाका पाटील
- पुणे - गिरीश बापट
- दिंडोरी - डॉ. भारती पवार
- जळगाव - स्मिता वाघ
- सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी
- बारामती - कांचन कुल
भाजप मुंबईतील सहापैकी तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र किरीट सोमय्या खासदार असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघ वगळता इतर जागांवरील उमेदवारांची घोषणा झाल आहे. शिवसेनेकडून सोमय्यांच्या नावाला विरोध असल्यामुळे सोमय्यांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे.
पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी हे वाराणसीतून, गृहमंत्री राजनाथ सिंह लखनौमधून तर भाजपाध्यक्ष अमित शाह गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत.
देशभरातील महत्त्वाचे उमेदवार
वाराणसी - नरेंद्र मोदी
लखनौ - राजनाथ सिंह
नागपूर - नितीन गडकरी
गांधीनगर - अमित शाह
बागपत - डॉ सत्यपाल सिंह
गाजियाबाद - वीके सिंह
गौतम बुद्ध नगर - महेश शर्मा
मथुरा- हेमा मालिनी
अमेठी - स्मृती इरानी
उत्तर कन्नड - अनंत कुमार हेगडे
उन्नाव - साक्षी महाराज
अरुणाचल पूर्व - किरेन रीजीजू
आसनसोल- बाबुल सुप्रियो
संबंधित बातम्या
लोकसभा निवडणूक : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा