Loksabha Election 2019 : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 23 Mar 2019 08:10 AM (IST)
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत काँग्रेसने देखील महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली आहे. दरम्यान काँग्रेसकडून अजूनही पुण्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत काँग्रेसने देखील महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसने चंद्रपूरमध्ये विनायक बांगडे यांना उमेदवारी देऊन भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्यासमोर आव्हान निर्माण केलं आहे. काँग्रेसकडून जालन्यात विलास औताडे, औरंगाबादमध्ये सुभाष झांबड, भिवंडीत सुरेश टावरे आणि लातूरमध्ये मच्छिंद्र कामनात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. दरम्यान काँग्रेसकडून अजूनही पुण्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही. औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आलेली नाही. या जागेच्या बदल्यात जी अदलाबदल व्हायला पाहिजे होती ती अद्याप दिसत नाही. उमेदवार यादी
नंदुरबार - के. सी. पडवी
धुळे - कुणाल रोहिदास पाटील
वर्धा - चारुलता टोकस
मुंबई दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड
यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे
शिर्डी- भाऊसाहेब कांबळे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नवीनचंद्र बांदिवडेकर
नागपूर - नाना पटोले
सोलापूर - सुशीलकुमार शिंदे
मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त
मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा
गडचिरोली-चिमूर - डॉ. नामदेव उसेंडी
चंद्रपूर- विनायक बांगडे
जालना- विलास औताडे
औरंगाबाद- सुभाष झांबड
भिवंडी - सुरेश टावरे
लातूर- मच्छिंद्र कामनात
मित्रपक्षाचा जागा सोडण्यावरून गोंधळ अजूनही कायम दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मित्रपक्षांची आज महाआघाडीची घोषणा होणार आहे. पण मित्रपक्षाचा जागा सोडण्यावरून गोंधळ अजूनही कायम आहे. दक्षिण नगरची जागा जशी काँग्रेसला हवी होती तशी राष्ट्रवादीने औरंगाबादची जागा काँग्रेसकडे मागितली होती. औरंगाबादच्या बदल्यात नगर असा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिला होता. पण नगरची जागा राष्ट्रवादीने सोडली नाही आणि सुजय विखे पाटील सोडून गेले. तसेच काँग्रेसने पण औरंगाबाद जागा सोडली नाही आणि उमेदवार जाहीर करून टाकला आहे. आघाडी झाली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये शेवटपर्यंत आपल्याला हव्या असणाऱ्या जागांबाबत रस्सीखेच शेवटपर्यंत सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने हातकणंगले जागा सोडली तर काँग्रेसने आपल्या कोट्यातून एक जागा सोडणे अपेक्षित होते. सांगली जागा सोडण्याचे ठरवले पण काँग्रेसमधील गटाने बंड केल्याने अजूनही त्या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आपल्या कोट्यातून सोडत आहे. काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, माणिकरावांसह एकनाथ गायकवाडांना उमेदवारी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी उमेदवार यादी 19 मार्च रोजी जाहीर झाली होती. नऊ जणांपैकी महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश या यादीत आहे. मुंबई दक्षिण मध्य मधून एकनाथ गायकवाड यांना, तर यवतमाळ-वाशिममधून माणिकराव ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरी उमेदवार यादी नंदुरबार - के. सी. पडवी धुळे - कुणाल रोहिदास पाटील वर्धा - चारुलता टोकस मुंबई दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे शिर्डी- भाऊसाहेब कांबळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नवीनचंद्र बांदिवडेकर लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार पहिली उमेदवार यादी नागपूर - नाना पटोले सोलापूर - सुशीलकुमार शिंदे मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा गडचिरोली-चिमूर - डॉ. नामदेव उसेंडी संबंधित बातम्यालोकसभा निवडणूक : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा