उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार, जाहीरनाम्यात राम मंदिरासह, 370 कलम रद्द करण्याची घोषणा : सूत्रांची माहिती
एबीपी माझा वेब टीम | 07 Apr 2019 05:25 PM (IST)
भाजपनं 2014 मध्येही राज्यघटनेच्या चौकटीत बसून राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्व प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसंच काँग्रेसच्या न्याय योजनेला भाजपच्या जाहीरनाम्यातून कशाप्रकारे पाहिलं गेलंय हे उद्याच समजणार आहे.
नवी दिल्ली : भाजप उद्या लोकसभा निवडणुकासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने राम मंदिर निर्माण, जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द करणं आणि समान नागरी संहिता रद्द करण्यासंदर्भात उल्लेख असण्याची शक्यता आहे. VIDEO | भाजपच्या जाहीरनाम्यात पुन्हा एकदा राम मंदिराचं आश्वासन, सूत्रांची माहिती | एबीपी माझा त्यासोबतच महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपनं 2014 मध्येही राज्यघटनेच्या चौकटीत बसून राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्व प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसंच काँग्रेसच्या न्याय योजनेला भाजपच्या जाहीरनाम्यातून कशाप्रकारे पाहिलं गेलंय हे उद्याच समजणार आहे.